फॉलोअर

ऑनलाईन स्टोअरेज

 

वेदांत आणि समर्थ पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. समर्थ ला संगणका मध्ये रुची असल्याने व करिअर च्या दृष्टीने उपयुक्त असा एम.एस.सी.आय.टी. हा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला आहे. दोन दिवसापूर्वी वेदांत आणि समर्थ यांनी “विद्यापीठस्तरीय पेपर प्रेझेन्टेशनची सूचना” सूचना फलकावर वाचली आणि दोघांनीही ठरवल कि या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा.पण वेदांत ला संगणकाचे ज्ञान नसल्याने तो सर्वस्वी समर्थ वर अवलंबून आहे, त्या दोघांनी ठरवल कि प्रथम प्रेझेन्टेशन विषयाचा अभ्यास पूर्ण करायचा, त्याच्या नोट्स काढायच्या आणि मग त्याचे संगणकीय प्रेझेन्टेशन तयार करायचे, या प्रेझेन्टेशन तयार करण्याच्या कामात समर्थ वेदांत ला मदत करणार त्यानुसार त्यांनी अभ्यास सुरु केला.

          पेपर प्रेझेन्टेशन साठी यु.एस.बी ड्राईव्ह (अर्थात पेन ड्राईव्ह), गुगल ड्राईव्ह ची सुविधा वापरता येणार अशी सूचना दोघांना अगोदरच प्राप्त झालेली होती, त्यानुसार वेदांत ने समर्थ ला विचारले, “समर्थ, पेन ड्राईव्ह मला माहिती आहे, तो मी तुझ्याकडे पाहिला आहे पण गुगल ड्राईव्ह काय प्रकार आहे? पहिल्यांदाच ऐकत आहे, मला या बद्दल सांग ना, समर्थ म्हणाला “अवश्य सांगेन, गुगल ड्राईव्ह हे क्लाऊड स्टोअरेज आहे, ऑनलाईन स्टोअरेज सुविधा उपलब्ध करून देते. तुमच्याकडे इंटरनेट सुविधा असल्यास तुम्ही गुगल ड्राईव्ह वर स्टोअर केलेला डेटा कधीही वापरता येतो. गुगल ड्राईव्ह मध्ये

एखाद्या युजरला १५ गेगा बाईट्स पर्यंत डेटा स्टोअर करून ठेवता येतो आणि ते हि अगदी मोफत !!! आहे ना कमाल , वेदांत ! आपण पेन ड्राईव्ह वापरतो पण त्यात काही अडचण आल्यास, बिघाड झाल्यास, व्हायरस संक्रमित झाल्यास आपल्याला वापरता येत नाही अशा वेळी डेटा बॅकअप म्हणून आपण गुगल ड्राईव्ह पर्यायाचा वापर करू शकतो, जो मी म्हणेन एक सुरक्षित पर्याय आहे. एकदा गुगल ड्राईव्ह ला स्टोअर केलेला डेटा तुला परत पहायचा किंवा वापरायचा झाल्यास तुझ्याकडील स्मार्ट फोन, टॅबलेट अथवा कॉम्प्युटर च्या सहाय्याने तू तो वापरू शकतोस. तुला यासाठी फत जी मेल सर्व्हिस प्रोव्हायडरचा मेल आयडी असणे आवश्यक आहे. या प्रकारची सेवा एम.एस.ऑफिस २०१३ मध्ये देखील देण्यात आलेली आहे. हि सेवा मायक्रोसॉफ्ट तर्फे देण्यात आलेली आहे त्या सेवेस स्काय (वन) ड्राईव्ह असे म्हणतात. या सेवेचा उपयोग करून एम.एस.ऑफिस मध्ये तयार केलेली फाईल लागलीच स्काय ड्राईव्हवर सेव्ह करता येते.

          समर्थ, फारच उपयुक्त माहिती तू आज मला दिली आहेस खरच मनापासून धन्यवाद !! तु दिलेल्या माहितीमुळे मी हि ठरवलं आहे एम.एस.सी.आय.टी. हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि विविध डिजिटल सिटीझनशिप कौशल्य आत्मसात करायची. तुम्हीही आमच्या अधिकृत एम.एस.सी.आय.टी. केंद्रास भेट द्या. 

विद्या कॉम्प्युटर्स, श्रीकांत नगर, जुळे सोलापूर. 

https://vidya-computers.business.site ह्या लिंकला भेट द्या व "गेट कोट" वर क्लिक करावं.


अमित बाळकृष्ण कामतकर 

सोलापूर   

इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं      

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?