वेब पेज तयार करणे- एक कौशल्य
कॉलेज चा
नोटीस बोर्ड ज्यावर, कोण बनेल आय टी जिनिअस ? ह्या स्पर्धे विषयी नोटीस लागली आहे.
दिनेश आणी रितेश दोघे एकाच वर्गात शिकत आहेत. दोघांनी स्पर्धे विषयी अटी आणि विषय
समजून घेतले, विषया मध्ये वर्ड चा वापर करून वेब पेज तयार करणे असा एक विषय
देण्यात आला आहे. दिनेश ला संगणकाचे ज्ञान असल्याने तो लागलीच रितेश ला म्हणाला,
अरे, मी हे करू शकतो आपण हाच विषय निवडूया !! रितेश म्हणाला , मला या बद्दल काहीच
माहिती नाही आणि तू तोच विषय घ्यायचा म्हणतोस,” “दिनेश म्हणाला, मित्रा, काळजी करू
नकोस कारण मला संगणक हाताळता येतो.”
मायक्रोसॉफ्ट वर्ड चा वापर करून वेब पेज तयार करता येते हे एक नवीन कौशल्य आज रितेश ला समजणार आहे, त्यामुळे तो खूपच खुश झाला आहे. वर्ड मध्ये ज्या प्रकारे आपल्याला वेब पेज हवे आहे, ज्या प्रकारचे ले-आउट हवे आहे त्याप्रकारचे ले-आउट वापरता येते.कारण वर्ड मध्ये न्यूज लेटर स्टाईल फॉरमेट वापरता येतो. साधे डॉक्युमेंट तयार करता येते, सोबतच फोटो अलायनमेंट करून उत्कृष्ट ले-आउट तयार करता येते. युजरला ज्या प्रकारचे डॉक्युमेंट टायटल हवे आहे आहे त्याप्रकारे फॉरमेट करता येते, त्याचा फोन्ट स्टाईल, फोन्ट हि सुविधा वर्ड सहज उपलब्ध करत. हे सगळ दिनेश रितेश ला संगणकावर करून दाखवीत नवीन वेब पेज तयार करीत सांगत होता. वर्ड चा असाही वापर करता येतो यावर रितेश चा विश्वास बसत नव्हता, पण हे सर्व प्रात्यक्षिक त्याच्या समोर दिनेश करीत होता. वर्ड मध्ये युजरला हवे ते फोटोज अथवा लिंक अॅड करता येतात. हे फोटोज ज्या प्रकारे अक्षरा भोवती ठेवायचे असतील त्या प्रकारे त्याची मांडणी करता येते, शिवाय विविध लिंक देखील आवश्यकते नुसार वापरता येतात.
हे सर्व दिनेश ने अगदी सफ़ाईत पणे रितेश
ला करून दाखविले आणि बघता बघता त्याच वेब पेज तयार झाल. आता तयार झालेलं
डॉक्युमेंट वेब पेज म्हणून स्टोअर करायचं दिनेश एम.एस.सी.आय.टी. कोर्स मध्ये
शिकलेला असल्याने त्याने फाईल वेब पेज म्हणून स्टोअर केली आणि रितेश ला म्हणाला,
“रितेश झाल बघ वेब पेज तयार, उगाच टेन्शन घेत असतोस.” यावर रितेश म्हणाला, “दोस्ता,
आता वेळ न दवडता मी संगणक शिक्षण घेणार आणि विविध कौशल्य आत्मसात करणार.” आपण जे
वेब पेज तयार करतो ते पाहण्यासाठी आपल्याकडील ब्राउजर (इंटरनेट एक्सप्लोरर, मोझीला
फायरफॉक्स, गुगल क्रोम आदी) चा वापर करता येतो. वेब पेज ज्या ठिकाणी सेव केले आहे,
तिथून ते या ब्राऊजर मध्ये ओपन करता येते. हि एक साधी सोपी पद्धत आहे. हा पण जर
तुम्ही वेगळा डोमेन म्हणजे वेगळी वेब साईट तयार करणार असाल तर तुम्हाला डोमेन
खरेदी करावा लागेल आणि तिथे हि तुम्ही तयार केलेले वेब पेजेस स्टोअर करावे लागतील.
मग तुम्हाला इंटरनेट च्या सहाय्याने देखील तुम्ही तयार केलेले वेब पेजेस कुठूनही
ओपन करता येतील.
काही दिवसांनी कॉम्प्युटर च्या सरांनी
वर्गात आय टी जिनिअस स्पर्धे बद्दल विचारल, स्पर्धेत कुणी कुणी भाग घेतला ? , तर
रितेश ने लागलीच हात वर केला. त्यावर सरांनी त्याला कृती विस्ताराने सांगायला
सांगितली. सर्व कृती रितेश ने अगदी व्यवस्थित सांगितली यावर सरांनी रितेश ला
शाबासकी दिली आणि त्याच सगळ्या वर्गात कौतुक देखील केले.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा