पोस्ट्स

यशोगाथा - फ्लिपकार्ट

इमेज
मागील २ दशकांमध्ये इंटरनेट व त्या माध्यमातून खरेदी करणे याची व्याप्ती सर्व ठिकाणी पहावयास व अनुभवास येते. ई-कॉमर्स ची पाळ-मूळ आता खूप खोलवर रुजून प्रत्येक भारतीयाच्या रोजच्या जीवनाचा हिस्सा बनु पहात आहेत. ऑनलाईन खरेदी-विक्री करणे म्हणजेच ई-कॉमर्स आणि त्यात होणारी उलाढाल उल्लेखनीय आहे. भारतात ई-कॉमर्स सर्वांपर्यंत आज पोहोचले आहे असे नाही म्हणता येणार पण वापर करण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे नक्की !!!             फ्लिपकार्ट हे नाव बऱ्याच मंडीळीना चांगलच परिचयाच आहे. ज्या मंडळींनी ऑनलाइन (इंटरनेट च्या माध्यमातून) खरेदी केली आहे त्यांना फ्लिपकार्ट चा उत्तम परिचय आहे. त्यातच वर्तमानपत्र आणि टेली-व्हिजनवर जाहिराती च्या माध्यमातून या कंपनीचा परिचय झालेला असेलच ! फ्लिपकार्ट चा जन्म २००७ मध्ये अवघ्या ४ लाख भांडवलावर झाला.ते भांडवल देखील वेबसाईट तयार करणे आणि त्याची जाहिरात करणे यासाठी वापरण्यात आलं होत. फ्लिपकार्ट ची सुरुवात सचिन व बिन्नी बन्सल या आय आय टी दिल्ली च्या युवकांनी फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रा.ली. या ना...

स्मार्ट फोन खरेदी करायचा आहे, पण कोणता ?

इमेज
अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत असे आपण म्हणत असू , तो काळ आता संपला, या गरजासोबत अजून एक गरज आजच्या युगात नित्याची बनली आहे ती म्हणजे मोबईल फोन !! “स्मार्ट फोन” आता प्राथमिक गरजा मध्ये आपले स्थान भक्कम करू लागला आहे. नुसता मोबईल फोन असण्यापेक्षा तो “स्मार्ट फोन” असणं प्रतिष्ठेच मानल जात किंबहुना प्रतिष्ठेच झाल आहे. पण बऱ्याच वेळा हा स्मार्ट फोन घ्यायचा कुठला, कोणता त्याचे स्पेसिफिकेशन (तपशील) कसे पहायचे ? कोणते ते कसे ठरवायचे हे माहिती नसल्याने आपण आपल्या पहाण्यात जो स्मार्ट फोन आलेला असतो तोच खरेदी करतो. आज आपण जाणून घेवूयात स्मार्ट फोन खरेदी करताना त्याचे स्पेसिफिकेशन्स सुद्धा कसे महत्वाचे असतात. प्रोसेसर : स्मार्ट फोन मध्ये विविध प्रोसेसर येतात.त्यामध्ये ड्युअल कोअर थोड्या कमी किमतीत उपलब्ध होवू शकतात. नाहीतर ओक्टा कोअर अधिक किमतीत उपलब्ध आहेत.स्मार्ट फोन घेण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे एका वेळी अनेक कार्य (मल्टी-टास्किंग) करता यावीत. एका अप्लिकेशन मधून दुसऱ्या अप्लिकेशन मध्ये सहज जाता यावं हाही उद्देश स्मार्ट फोन घेताना असतो.चांगल्या आणि अधिक स्पीड...

संगणकावर फोटो अल्बम तयार करणे

इमेज
फोटो अल्बम म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय कारण त्यात आठवणी गुंतलेल्या असतात. भाव भावनांचे अनोख नात दडलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकास त्याच महत्व नेहमी वेगळच असतं. मग असा हा अल्बम सॉफ्ट कॉपी (प्रिंट काढायची नाही) मध्ये तयार करणे यात काही औरच मजा आहे !! फोटो अल्बम तयार करण्यासाठी खूप सारे रेडीमेड सॉफ्टवेअर तुम्हाला सहज उपलब्ध होतीलही पण तुम्हास माहिती आहे का असा फोटो अल्बम आपल्याला पॉवरपॉईंट मध्ये अगदी सहज करता येतो. चला तर मग जाणून घेवू फोटो अल्बम कसा तयार करायचा ?             मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट २०१० असेल अथवा २०१३ असेल या दोन्ही आवृत्या मध्ये आपण फोटो अल्बम तयार करू शकतो. यासाठी गरज आहे ती आपल्या डिजिटल कॅमेरातील फोटो आपल्या कॉम्प्युटर वर घेण्याची त्यासाठी तुमच्या कॅमेराची USB केबल जोडा व सर्व फोटोज कॉपी करून तुमच्या कॉम्प्युटर च्या सी ड्राइव्ह सोडून इतर कोणत्याही ड्राइव्ह किंवा फोल्डर मध्ये पेस्ट करा. अथवा तुम्हाला थेट तुमच्या कॅमेरा वरून सुद्धा घेता येतील. त्या नंतर मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट ओपन करा आणि त...