पोस्ट्स

www – वल्ड वाईड वेब

इमेज
www अर्थात वेब ज्यावर एकत्रित साठवलेल्या माहितीतून ठराविक माहिती मिळविण्याची सुविधा यामुळे आपणांस आज मिळते आहे. वेब मुळे आपल्याला एकमेकाशी हायपरटेक्स्ट / हायपर मीडिया लिंक्स च्या सहाय्याने जोडलेल्या विविध डॉक्युमेंट्स ची माहिती सहज उपलब्ध होवू शकते, अशा या www- वेब ह्या संकल्पनेला आज तीस वर्षे झाली. १२ मार्च १९८९ रोजी टीम बर्नर ली या इंग्लिश शास्त्रज्ञाने वल्ड वाईड वेब ची सुरुवात केली. टीम बर्नर ली त्यावेळी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लीअर रिसर्च (CERN) येथे सेवा बजावत होते. याच दरम्यान त्यांनी वेब ब्राऊजर तयार केला पण तो या ऑर्गनायझेशनच्या बाहेर प्रकाशित करण्यात आला. डॉक्युमेंट्स अथवा वेब स्त्रोतांना पाहण्यासाठी ब्राऊजर चा वापर करून झालेली हि सुरुवात, इंटरनेट मध्ये क्रांतीच म्हणावी लागेल. हे वेब स्त्रोत यु.आर.एल. (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर) च्या मदतीने पाहण्यास सुरुवात झाली जसे कि www. example.com , यामध्ये विविध हायपर टेक्स्ट ज्या विविध लिंक्स ने जोडलेले असतं अशा लिंक्स ना इंटरनेट च्या सहाय्याने पाहता येवू लागले. वेब हि संकल्पना क्लायंट सर्वर या फॉरमॅट मध्ये काम करते. इंटरनेट...

आय.ओ.टी. शी संबंधित पाच स्मार्ट साधनं

इमेज
इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयी अगोदरच लेख तुम्ही वाचला आहे, तो पुस्तकात देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज हि संज्ञा सर्व प्रथम १९९९ मध्ये एका ब्रिटीश व्यावसायिकाने अॅटो आय-डी लब मध्ये वापरली परंतु आता तज्ञांच्या मते इंटरनेट ऑफ थिंग्ज २०२० पर्यंत म्हणजे अगदी पुढच्या वर्षी पर्यंत या मध्ये २६ अब्ज वस्तूंचा समावेश असेल. इंटरनेट ऑफ थिंग्ज विविध गोष्टींचा बोध घेवून त्यांना उपलब्ध नेटवर्क पायाभूत सुविधांचा वापर करून, दूरस्थपणे (remotely) नियंत्रित करू शकेल. यामुळे वास्तविक जग आणि संगणकीय प्रणाली यांचा मेळ घालणे शक्य होणार आहे. अर्थातच याचा फायदा कार्यक्षमता वाढण्यात, अचूकपणा व आर्थिक बचत या सर्वामध्ये होणार आहे. आज मी तुम्हाला काही आय. ओ. टी. संबंधित वस्तूंची माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुमचं जग अगदी बदलून जाईल. १.     हावभाव नियंत्रण करणारे यंत्र ( Gesture Control Armband ): कोणतीही गोष्ट करायची असल्यास आपले हावभाव बदलतात, हात वारे करताना हे टिपता येवू शकतात मग तुमच्या याच हावभावा वर हे यंत्र काम करणार आहे. यात काही इलेक्ट्रोडस् (विद्युत घटाचा ध्रुव) लावल...

गुगल डुडल !!

इमेज
गुगल आज (२७/०९/२०२३) २५ वर्षाचं होत आहे. आजचे डूडल गुगलचा लोगो चा प्रवास दाखवीत आहे. १९९८ ला सुरु झालेला “वेब वर माहिती हुडकण्याचा” प्रवास निरंतर सुरु आहे. १९९८ ला सगळ्याना भीती होती ती Y2K ची, काय होईल २००० साली? काही कॉम्प्युटर प्रोग्राम मध्ये कोडींग ज्या प्रकारे केलेले होते त्याप्रमाणे वर्ष बदलेल का कॉम्प्युटर साल १९०० दाखवेल. या भितीने त्यावेळी गुगल ला सर्वात जास्त विझिट्स झाल्या असाव्यात. याहू मेल जास्त वापरलं जायचं त्याचवेळी हॉट मेल हि वापरात होतं पण जिथे कनेक्टीव्हिटी चाच विषय होता तिथे हे सगळं आता सारखं लगेच उपलब्ध होत नव्हतं. सोलापुरात (किंबहुना सगळीकडेच) ९७-९८ दरम्यान इंटरनेट जोडणीला बराच वेळ लागायचा, तेंव्हा डायल-अप कनेक्शन्स असायचे. कधी कधी लागलीच जोडणी व्हायची नाहीतर बराच वेळ कनेक्टीव्हिटी मिळतच नव्हती. मग अशा परिस्थितीत कुठलं "गुगल" आणि काय ? त्यावेळी कॉलेज युवक-युवतींना लायब्ररी शिवाय पर्याय नसायचा, अभ्यासा विषयी काही हवं असल्यास हि मुलं लायब्ररी मध्ये जायची. (आज मुलं जात नाहीत अस मला अजिबात सुचवायचं नाही). आज काहीहि माहिती हवी असली कि ठरलेलं असतं “गुगल करा...

तुमचा आवाज बनू शकतो तुमची लेखणी

इमेज
तुमचा आवाज बनू शकतो तुमची लेखणी आश्चर्य वाटलं असेल शीर्षक वाचून पण आता आय.टी. च्या जमान्यात तुम्हास वाचता येते का आणि स्पष्ट उच्चार आहेत का ? हे दोन प्रश्न महत्वाचे असणार आहेत. तसे पहिले तर  संगणक युजरला टाईप करण्याचे कौशल्य आत्मसात असणे आवश्यक आहे, त्याशिवाय तो संगणकाचा वापरच करू शकत नाही मग हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी युजर टाईपिंग वर प्रभुत्व मिळवितो. एखादा लेखक जेंव्हा लेखन करतो तेंव्हा त्याची लेखणी त्यास मदत करते. मला वाटतं लेखकास महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये त्याचे विचार आणि ते कागदावर उतरविण्यासाठी आवश्यक असणारी त्याची लेखणी.. मग हि लेखणी नव्या जमान्यातील का असेना, कारण नव्या जमान्यात लेखणी ने देखील बरेच बदल स्वीकारले आहेत अस म्हणालो तर वावगं होणार नाही. हे बदल भौतिक असतील, त्याच्या स्वरूपात झालेले असतील वा तंत्रज्ञाना मुळे झालेले असतील. आता पहा ना, सुरुवातीला टाईप रायटर होते, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टाईप रायटर आले मग संगणक कि-बोर्ड आला आणि जसा स्मार्ट फोन चा वापर वाढला तसा आपण सर्वजण स्मार्ट फोन चा कि-बोर्ड वापरू लागलो, आता हा कि-बोर्ड म्हणजे “लेखणीच” म्हणावी लागेल, ...