ई.व्ही.एम.- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन
ई.व्ही.एम. अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन भारतात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (हैदराबाद) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (बंगळूरू) ने तयार केलेली हि मशीन जिच्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. अशी मशीन साधारण १९९० साली तयार करण्यात आली आणि नंतर १९९८ ते २००१ दरम्यान टप्प्या टप्प्याने आणि २००४ लोकसभा आणि सर्व साधारण निवडणुकामध्ये वापरण्यात आली. या मशीन ची विविध स्तरावर चाचणी घेवूनच याचा वापर सुरु करण्यात आला हे महत्वाचे ! हे मशीन वापरात येण्या अगोदर बॅलेट पेपर वापरला जायचा हे आपण जाणताच, बॅलेट पेपरच्या वापर (ज्यामध्ये फसवे मतदान, बूथ कॅप्चरिंग करणे सहज शक्य होते) करण्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर या मशीन्स चा वापर सुरु करण्याचा विचार निवडणूक आयोगाने घेतला हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. बूथ कॅप्चरिंग करून मतदान करणे या बाबी कशा व्हायच्या याचा अभ्यास करणे अथवा त्यावर विचार व्यक्त करणे आवश्यक नाही, पण हे व्हायचे म्हणून आयोगाने हा निर्णय घेतला. एक मत देण्यास लागणारा वेळ ई.व्ही.एम. ने ठराविक केला त्यामुळे एका मिनिटात फक्त पाच मते रेकॉर्ड केली जातात. या बाबी मुळे मतदान प्रक्रिये...