पोस्ट्स

दिल-विल प्यार-व्यार

इमेज
  सतीश,राजेश आणि महेश तिघे सच्चे दोस्त, अगदी लंगोटीयार अस काही तरी असतं ना, ते, अगदी तसं, तिघांच्या शाळा वेग-वेगळ्या पण एकाच इयत्ते मध्ये असताना भेटलेले (आयुष्यातील महत्वाची घटना म्हणा हवं तर) हे तिघे आजही एकत्र आहेत. एकमेका शिवाय चैन पडत नाही या तिघांना ....आता महेश अमेरिकेत नोकरीस आहे तर सतीश खासगी बँकेत मोठ्या पदावर आहे आणि राजेशचा स्वत:चा व्यवसाय आहे. हे तिघे बीड चे. साधारण वीस-एक वर्षापूर्वीची गोष्ट, पदव्युत्तर शिक्षण घेत असताना सतीश ची औरंगाबादेत एका कार्यक्रमात मीनल शी ओळख झाली. मीनल मुळची औरंगाबाद ची, ती तिथे शास्त्र शाखेत शिकत होती. ह्या ओळखीला खरे पाठबळ मिळाले ते टेलीफोन ने !! दो दिल मिल रहें है, अस काहीतरी सिन होता तो, तेंव्हा मोबाईल नव्हते त्यामुळे फोनवर संपर्क, एकमेकास ओळखणे मग विविध विषयावर चर्चा, वेळी-अवेळी फोन, रंगणाऱ्या गप्पा आणि अर्थातच संपर्कातून पुढील पायरी... (फक्त सतीशच्या मनात) तुम्ही ओळखलं असेलच.....हे फोना फोनी प्रकरण सतीश च्या घरी माहिती होते, त्यांचा होकार होता अस मी म्हणणार नाहि पण कल्पना होती.एके दिवशी सतीश, राजेश आणि महेश यांच्यात चर्चा रंगली मीनल चे ख...

व्हाटसअॅप प्रायव्हसी पॉलिसी – काय करावं ?

इमेज
नवीन पॉलिसी ८ फेब्रुवारी पर्यन्त स्विकार करावी असं  व्हाट्सएपच म्हणणं आहे, त्यामुळे खूप गोंधळ उडाला आहे असं दिसतं, या गोंधळात दुसऱ्या अॅप वर जायचं की  व्हाट्सएपच वापरत राहायचं याचा निर्णय घेण्यास सोईचे जावे म्हणून हा लेख.  सरळ मुद्यालाच सुरुवात करूया....      इतर अॅप वर जशा जाहिराती दिसतात तशाच जाहिराती आता व्हाट्सएप वर दिसतील , फेसबुक वर फेसबुक फॉर बिझनेस मधून तुम्ही व्हाट्सएपला जोडले जाऊ शकता , फेसबुक वरील जाहिरात जशी timeline (sponsored) वर दिसते तशीच ती आता व्हाट्सएप वर दिसेल , (एक शक्यता) राहिला विषय पेमेंट आणि इतर बाबी त्या या पूर्वीच आपण सगळ्यांनी शेअर केलेल्या आहेत. ज्यांनी फेसबुक वर जाहिराती केल्या आहेत , जरा आठवून बघा तुमचा cvv कोड स्टोअर करू का? असा प्रश्न विचारला जातो (हे ठीक आहे की तुमच्या लॉग इन मध्येच ते असतं , फास्ट पेमेंट करणे हेतु फेसबुक हे स्टोअर ठेवतं असं कंपनीच म्हणणं आहे) , काहींनी त्यास केंव्हाच होकार दिलेला आहे , मग आता का म्हणून आपण गडबड , गोंधळ करतो आहोत ,  शेवटी राहिला प्रश्न तुमचा डेटा , कुणी काय शेअर करावं हे ज्याचा त्या...

व्हायरस पासून संरक्षण

इमेज
          नीलिमा शहरातील एका फायनान्शियल कंपनीत नोकरीस आहे, तिने तिच्या कॉम्प्युटरवर ऑफिसचा सर्व डेटा स्टोअर केला आहे आणि रोजच्या रोज ती त्याचा बॅकअप देखील घेते. एके दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस आल्यावर ती तिच्या कामात व्यस्त झाली आणि तिचे ऑफिसच्या विविध फाईल्स चे संगणकीकरण करणे सुरु होते तेवढ्यात तिचे लक्ष शेजारील डेस्क वरील प्रणाली कडे गेले, तिच्या अस लक्षात आल कि प्रणाली बराच वेळ झाला काहीच काम करत नाहीये, तिने लागलीच प्रणालीला विचारल, “का गं प्रणाली, काय झाल?”, आज काय मूड नाही का काम करायचा? यावर प्रणाली म्हणाली, “नाही गं, नीलिमा, अस काही नाही पण माझ्या कॉम्प्युटरवरील फाईल्स ओपन होत नाहीत त्यामुळे टेन्शन आल आहे.”            नीलिमा ने प्रणालीला तिच्या कॉम्प्युटर चा पासवर्ड मागितला आणि तिच्या कॉम्प्युटरवर ती फाईल्स ओपन होतात का ते पाहू लागली. तिच्या लक्षात आले कि ज्या प्रोग्राम मध्ये फाईल्स तयार केलेल्या आहेत तोच प्रोग्राम ओपन होत नाहीये!! ती लागलीच प्रणाली ला म्हणाली, अग तुझ्या कॉम्प्युटर वर...

WhatsApp बंद होणार

इमेज
  घाबरू नका .... पण हे खरे आहे. कांही स्मार्ट फोन साठी ०१ जानेवारी २०२१ पासून   WhatsApp आपली सेवा बंद करणार आहे. WhatsApp हा मोबाईल (स्मार्ट फोन) वापरणाऱ्या मंडळींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्याशिवाय मोबाईलचा वापर हि संकल्पनाच पचनी पडत नाही. अर्थात तंत्रज्ञाचा वापर करणे कुठे थांबावे हे देखील आपल्याला कळायला हवे.. या पूर्वी ३१ डिसेंबर २०१६ ला काही स्मार्ट फोन वरील WhatsApp बंद झाले तशीच घोषणा WhatsApp ने आता पुन्हा केली आहे.           WhatsApp हा इन्स्टंट    मेसेंजर वापरला जातो विविध प्रकारचे मेसेजेस पाठविण्यासाठी , त्यात टेक्स्ट , ग्राफिक , मल्टी-मेडिया मेसेज देखील आले. या मेसेंजर च्या सहाय्याने आपण आपल्या भावना आपल्या मित्र-मैत्रिणी , नातेवाईकांपर्यंत पोहोचवितो. पूर्वी अर्थात २०१६ मध्ये जर तुमचा स्मार्ट फोन एन्ड्रॅाईड   2.१   किंवा 2.2 व्हर्जन चा होता , अथवा ब्लॅक-बेरी 10 ,  Nokia S40, Nokia Symbian S60 ,  iOS6 Windows Phone 7.1  तर तुम्हाला दुसरा पर्याय पहावा लागेल असे सांगण्यात आले...

पद्मश्री मो.रफी

इमेज
“ना फन्कार तुझसा तेरे बाद आया, मो.रफी तू बहोत याद आया”, १९९० साली प्रदर्शित झालेल्या क्रोध या चित्रपटातील हे गीत जे गायलं होत मो.अझीझ यांनी, या गीतातून रफी साहेबां विषयी एक प्रकरची कृतज्ञताच व्यक्त केली अस म्हणावे लागेल. आणि हे खरही आहे रफी साहेबां सारखा दुसरा गायक ना परत जन्माला आला ना परत येईल. रफींच्या आवजाशी साधर्म्य असणाऱ्या मध्ये शब्बीर कुमार, अन्वर, मो.अझीझ पासून थेट सोनू निगम पर्यंत हा प्रवास आहे, अजूनही काही गायक असतील हि..... पण या गायकांना प्रसिद्धी मिळाली. या गायक कलाकारांनी रफी साहेबांचा आवाज म्हणून बरेच ऑर्केस्ट्रा केले, चित्रपट केले. रफी यांना आपल्यातून जावून ४० वर्षे झाली. पण अजूनही “तेरे आने कि आस है दोस्त, तू कही आस पास है दोस्त” या त्यांनीच गायलेल्या गीता प्रमाणे ते आपल्या अवतीभवती आहेत असच वाटतं. तेरे आने कि.... हे रफी यांनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गीत..... एका कार्यक्रमात अपघाती संधी मिळाली आणि तो रफी यांचा पहिला कार्यक्रम म्हणावा लागेल. या कार्यक्रमात के.एन.सेहगल येणार होते पण ऐनवेळी लाईट गेली आणि आयोजकांना काय करावे सुचेना इतक्यात कुणीतरी रफी यांना गायला सुचविले, त...

ज्ञानवर्धन

इमेज
            रमेश या वर्षी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे, त्याला पदवीधर झाल्यावर नोकरी लागणे हेतू ज्ञान मिळवायचे आहे पण ते कसे मिळवावे हे त्याच्या लक्षात येत नव्हते, त्याला वाटे आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा हि पदवी संपादन करताना मिळाले ते नोकरी लागताना अथवा बाहेरच्या जगात वावरताना कमी पडू नये ! त्यासाठी तो नेहमी विविध माध्यमातून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करायचा, असेच एक दिवस, याच प्रयत्नात असताना त्याची भेट महेश शी झाली. महेश मागील वर्षी पदवीधर झाला होता आणि आता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करीत होता. हे रमेशला माहिती होते, त्याने लागलीच महेश शी हस्तांदोलन केले आणि त्यास म्हणाला, “अरे महेश, पदवी सोबत अजून ज्ञान वाढविण्यासाठी तू काय केले होते, मलाही थोड मार्गदर्शन कर ना ! यावर महेश उत्तरला, “रमेश, तुला नक्की कशाप्रकारचे ज्ञान वाढवायचे आहे, म्हणजे सॉफ्टस्कील हवेत कि तुझ्या पदवी शिक्षणातील अत्याधुनिक बदल तुला जाणून, शिकून घ्यायचे आहेत ? हे आधी मला सांग यावर रमेश म्हणाला , “मला माझ्या पदवी अभ्यास क्रमाशी सबंधित बदल जाणून...

सोशल मीडिया- उघडा डोळे समजून घ्या नीट !

इमेज
  आज कॉम्प्युटर चे ज्ञान नसणारा अशिक्षित समजला जातो अस आपण ऐकतो आणि मानतो देखील, त्यामुळेच असावं कदाचित, माणूस जसं जमेल तसं कॉम्प्युटर आणि त्या अनुषंगाने येणारे तंत्रज्ञान वापरत असावा बहुतेक ! कदाचित तुम्ही सहमत नसाल पण सर्व्हेक्षण तर असचं सांगतं कि “मला वापरता येत नाही”, अस सांगणारे फारच कमी !! आता हेच पहा ना, तुम्ही फेसबुक वर आहात कां? याचं उत्तर १० पैकी ७ लोकांनी होकारार्थी दिल पण हि ७ मंडळी फेसबुक कसं वापरतात हा अभ्यासाचा विषय आहे, त्यांना एवढचं माहिती असतं ,”फक्त लाईक” ठोकायचा, पोस्ट काय आहे हे पहायचं नाही, विनोदाचा भाग म्हणून सांगतो एखाद्या दु:खत बातमीला हि काही मंडळी लाईक ठोकतात!! तो लाईक का दिलेला असतो हा मात्र संशोधनाचा विषय !       पोस्ट लाईक कशी करायची हे शिकवावं लागत नाही पण चित्रास मिळणारी पसंती हि मजकुरास मिळणाऱ्या पसंती पेक्षा जास्त असते, कारण “वाचाल तर वाचाल” हे शाळेत होत, शाळा संपली पाटी खरोखरच फुटली ! अशी काहीशी परिस्थिती आजकाल पहायला मिळते, खर तर सोशल मीडिया साईटस्, ब्लॉग हि सर्व वाचनीय होवू शकतात (नव्हे आहेतच, फक्त आपल लक्ष नसतं) असा व...