पोस्ट्स

कर्मचारी आणि संबंध

इमेज
    कोणत्याही संस्थेसाठी / कंपनीसाठी त्याचा कर्मचारी हा अॅसेट असतो. त्याच्या सहकार्याने संस्था/ कंपनी पुढे वाटचाल करीत असते. कर्मचारी वर्गासोबत असणारे नाते हे कंपनीच्या / संस्थेच्या फायद्याचे ठरत असते. अनेक उदाहरणातून हे सिद्ध झाले आहे कि जिथे कर्मचारी वर्ग आनंदी असतो तिथे उत्पादन/ विक्री उत्तम होते. पण कर्मचारी वर्गसोबत नाते संबंध प्रस्थापित करणे आणि सोबत एक लक्ष्मण रेषा आखून ठेवणे हे देखील तितकच महत्वाच असतं , हे ज्यांना जमलं त्यांना व्यवसायातील महत्वाची बाब जमली असे मी म्हणेन. तुमच्या कंपनीची काम करण्याची एक सिस्टम हवी , त्या सिस्टमनी   तुमची कंपनी चालली पाहिजे , हे ध्यानात घ्यायला हवे , बऱ्याच वेळा काय होतं , कर्मचारी त्यांच्या सोई प्रमाणे काम करतात आणि मग अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ मालकावर येते , असं होऊ नये त्यासाठी सिस्टम तयार करा.   कंपनीतील कर्मचारी वर्गा सोबत कंपनीचे कंत्राट , भावनिक , व्यावहारिक स्वरुपात संबंध प्रस्थापित होवू शकतात , यातील प्रत्येक पैलूस महत्व द्यायला हवे. एक चांगला कर्मचारी संबंध कार्यक्रम हे सुनिश्चित करते की सर्व कर्मचार्‍यांना न...

काश्मीर फाइल्स - मार्दव रक्तलांछन

इमेज
            “काश्मीर फाइल्स” सोशल , इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये सध्या   ट्रेंडिंग आहे,   हा चित्रपट पाहून अनेक मंडळींनी त्यांची मते व्यक्त केली. चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला , हे सल्ले कुणी कुणी दिले त्याच्या बातम्या रोज येऊन धडकतात, त्यावर प्रतिक्रिया देखील देऊन काही मंडळी मोकळी झाली पण ही प्रतिक्रिया म्हणजे काय तर कुणी अंधभक्त, तर कुणी ह्या पक्षाचा, कुणी ह्या समाजाचा म्हणून त्याच्या कॅटेगरी ठरविण्यात आल्या. व्यक्त होणं सोडून देणं घातक वाटतं पण ‘व्यक्त’ झाल की लागलीच शिक्का मारला जातो हे कुठेतरी टोचतं तरी आज लिहितो आहे. इतिहास पाहायचा तर आता चित्रपट गृहात पाहायचा काय? त्यासाठीच सिनेमा आहे की काय? खरेतर समाजाचा आरसा म्हणजे सिनेमा, ठरवलं तर जे चांगल आहे ते घ्यायला काहीच हरकत नाही पण ..   असो एक ना अनेक प्रतिक्रिया उमटत असताना डोक्यात विचार येतो की “राजकारणाची फोडणी” दिल्याशिवाय आता देशात काही करता येत नाही काय? अभिव्यक्ति स्वातंत्र्य हा “फक्त गुळगुळीत शब्द” बनून राहू पहात आहे की काय? आपण व्यक्त होताना ते अभ्यासपूर्ण असाव एवढच...

स्टार्टअप – सुरुवात कशी करावी ?

इमेज
  स्वत :चा व्यवसाय आणि आवश्यक असणारी व्यावसायिकता अंगिकारणे त्यापुढे जाऊन उद्योजक बनणे असा हा प्रवास. या प्रवासास सुरुवात कशी करावी आणि कोणते मुद्दे ध्यानात घ्यावेत याविषयी मागील भागात आपण माहिती घेतलेली आहे. सोबत यशस्वी होण्यासाठी कान मंत्र देखील सांगितला आहे. आता मला वाटतं गरज आहे ती नव्या कल्पना घेऊन पुढे येण्याची , कल्पनांचा नवोन्मेष घेऊन युवक-युवतीनी पुढे यावे, विषयाविषयी सादरीकरण करावे, माहिती द्यावी, त्यावर चर्चा करावी स्वत:चा मुद्दा, विषय पटवून द्यावा, त्यास प्रमाणित करून घ्यावे आणि कामास लागावे. सोलापुरातील युवक मंडळीं कडे अफाट कल्पना आहेत त्यांनी त्या सादर कराव्यात आणि एका नवीन प्रवासास सुरुवात करावी. मागील भागात जसे आपणास सांगितले होते की सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांचे वतीने स्टार्ट अप आणि सेवा या विषयी पूर्ण सपोर्ट दिला जात आहे. तुम्ही कोणत्याही स्टार्टअप कल्पनेवर काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 3 गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे.   १.       तुम्ही तुमच्या स्टार्टअप कल्पनेवर उत्कट (पॅशनेट) आहात काय ? २.    ...

सॉफ्ट स्किल्सचे महत्व

इमेज
  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत. ही कौशल्यं   अचानक महत्वाची झाली का? पूर्वी ही कौशल्यं   लागत नव्हती आणि अचानक यांची मागणी वाढली ? असं काही नाही, तर याची गरज पूर्वीही होतीच फक्त त्याचे महत्व मागील पाच-दहा वर्षात वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. करिअरची निवड करताना यास अनन्य साधारण असे महत्व आहे आणि ते यापुढेही राहील. विद्यार्थ्यानी या गोष्टीस प्राधान्याने आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे सॉफ्ट स्किलची गरज तुम्हास भासणार नाही. शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी सॉफ्ट स्किल्स महत्वाची भूमिका पार पाडतात. सॉफ्ट स्किल्स तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हास उत्कृष्ट मदत करतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे असे जग असते, या जगात त्यास सांभाळून घेणारी मंडळी आजूबाजूस असतात पण जेंव्हा करिअरचा प्रश्न येतो अथवा जॉबला जाण्याचा प्रश्न येतो तेंव्हा सॉफ्ट स्किल्स बाहेरील जगास सामोरे जाण्यासाठी आणि सहकारी मंडळीं सोबत सहयोगी पद्धतीने कार्य करण्यासाठी आवश्यक ठरतात.           सॉफ्ट स्किल्स ज्यास आपण साम...

स्टार्टअप- उत्पादनाची व्यवहार्यता- समजण्यासाठी एम. व्ही. पी.

इमेज
  मला आशा आहे की आपण मागील दोन भाग वाचलेले असावेत. या भागात मी आपणास किमान व्यवहार्य उत्पादन विषयी मार्गदर्शन करणार आहे. Minimum Viable Product ( MVP ) ही तुमच्या उत्पादनाची अगदी मूलभूत आवृत्ती आहे जी त्वरित आणि स्वस्तात तयार करता येऊ शकते. याचा मूळ उद्देश लोकांचं उत्पादनात स्वारस्य आहे का? हे तपासणे आणि सत्यापित करणे हा आहे. कृपया “प्रोटो टाइप” आणि “ MVP ” मध्ये गोंधळ करून घेऊ नका. प्रोटोटाइप हा तुमच्या कल्पनेचा मसुदा आहे आणि MVP हे ग्राहक / परीक्षक यांच्या द्वारे वापरले जाणारे उत्पादन आहे. जो परीक्षक आहे तोच नंतर ग्राहक बनू शकतो. MVP चे खालील प्रकारचे फायदे मला दिसतात: १.       वेळ आणि पैसा वाचतो- MVP विकसित करणे सोपे आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी भांडवली गुंतवणूक गरजेची आहे. उत्पादन तयार झाल्यावर जर तुम्हास आढळले की उत्पादनास बाजारातून उत्तम प्रतिसाद येत नाहीये तर तुम्ही त्वरित ते बंद करू शकता आणि दुसऱ्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करू शकता. वेळ आणि पैसा वाचण्यास उत्तम मदत होते. २.       ग्राहक अभिप्राय: MVP विक...

स्टार्टअप- संकल्पनेची उपयोगिता प्रमाणित करून घ्यावी

इमेज
  मागील भागात (ब्लॉग:-स्टार्टअपची कल्पना)आपण कल्पना कशी शोधावी याविषयी माहिती घेतली आणि स्वत:च स्टार्टअप कसे सुरू होईल या दिशेने पहिले पाऊल टाकले. एखादी कल्पना सुचणे म्हणजे झालं असे नाही होत, त्यास प्रमाणित करावं लागतं, तुमचे उत्पादन बाजारात कसे परफॉर्म करेल हे तुम्हाला निश्चित करणे क्रमप्राप्त आहे. विविध कसौटयांवर तुमची कल्पना कितपत यशस्वी होऊ शकते हे पाहणं देखील तितकच महत्वाचं वाटतं मला. हे करायचं कसं हे जाणून घेण्या अगोदर स्वत:स विचारा की जे तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्ही आनंदी आहात काय? बाजारात तुमच्या सेवा घेणारा / उत्पादन खरेदी करणारा ग्राहक वर्ग आहे का? तुमची कुणाशी स्पर्धा होऊ शकते त्याच्याकडे कोणती वैशिष्ट्ये आहेत याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उदा. तुम्ही एखादे व्हिडिओ डावूनलोड करणारं अॅ प इनस्टाग्राम साठि तयार करीत आहात पण लक्षात घ्या तेच अॅप तुम्ही फेसबुक, यू-ट्यूब, यांच्यासाठी देखील वापरू शकता. बाजारात या प्रकारचे अनेक अॅप आहेत त्या अॅप पेक्षा तुमच्या अॅपमध्ये तुम्ही काही खास वैशिष्ट्ये देऊ केली तर सामान्य ग्राहक वर्ग देखील तुमच्या अॅप कडे आकर्षित होऊ शकतो. १.  ...

स्टार्टअपची कल्पना

इमेज
  स्टार्टअप हा शब्द आपल्या चांगला परिचयाचा झाला आहे. त्यास वेगळ्या ओळखीची गरज नाही असं वाटतं मला पण ज्या शिक्षण पद्धतीत आपण वाढलो, शिकलो ती शिक्षण पद्धती आपल्याला उत्तम जॉबची संधी देऊ करते, त्यापेक्षा वेगळं काही नाही. हे आपण जाणलं, समजलं पाहिजे. मग जर स्वत:चा स्टार्टअप करायचा असेल तर तुमच्याकडील कल्पनांना भरारी घेण्यासाठी पंख देण्याचे काम तुम्हालाच करावं लागेल. कल्पना ही अद्वितीय हवी, ती नवीनच असावी असे नाही एखाद्या प्रचलित गोष्टीमध्ये बदल करून नवीन सुरुवात देखील स्वागतार्ह आहे. मी माझ्या व्याख्यानात सांगतो तेच पुन्हा सांगेन “कल्पनांचा नवोन्मेष” फार महत्वाचा. आपल्या युवक वर्गाकडे असे कौशल्य आहे त्यास गरज आहे आत्मविश्वास देण्याची आणि “हो पुढे मी तुझ्या सोबत आहे” असा विश्वास देण्याची.           जमशेठजी टाटा यांना कोणती कल्पना सुचली की त्यांनी भव्य मोटर्स कंपनी बनविण्याचे ठरविले? धीरूभाई अंबानी यांना कोणती कल्पना सुचली आणि त्यांनी कंपनी सुरू केली जी आज सर्वात मोठी कंपनी आणि भारताची शान म्हणून आपण पाहतो. या दोघांमध्ये आणि इतर यशस्वी उद्योज...