पोस्ट्स

कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन

इमेज
“ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी ले लो”, या सुदर्शन फाकीर लिखित हे गीत आपण अनेक वेळा ऐकतो आणि आपल्याला वाटतं कि खरच असं घडावं, इच्छा तर खूप होते पण तस काही घडत नाही. बाल्यावस्था, किशोर, तारुण्य, जरावस्था या जीवनातील मनुष्याच्या अवस्था, या प्रत्येक अवस्थेतून मनुष्यास जावे लागते . विविध अवस्थांमध्ये विविध कामना मनुष्य बाळगून असतो, त्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी कार्यरत देखील असतो किंबहुना जीवाचं रान करत असतो. महाविद्यालयीन जीवन , टीन एज आयुष्यातील भन्नाट दिवस, जी काय मजा करायची ती याच दिवसात अस म्हणालो तरी अतिशयोक्ती होणार नाही, पॉकेट मनी हि महाविद्यालयीन जीवनात चालू व्हायची, साधारण ९० च्या दशकात तरी याच वेळी चालू व्हायची पण अलिकडे शाळेतच सुरु होते, असो, पण या पॉकेट मनी मध्ये जी काय धमाल असायची ती आज कमवत असलेल्या पैशात नाही. तसं पाहिलं तर लहानपणी खाऊ साठी पैसे मिळायचे, घरी आलेल्या नातेवाईकां कडून, मग ते पिगी बँकेत साठवायचे आणि खर्च करायचे असल्यास त्यातून खर्च करायचा असा रिवाज होता. या खाऊ साठी मिळणाऱ्या पैशास पॉकेटमनीच म्हणावी, नाही का? हि पॉकेट मनी त्या आयुष्यात मनमुराद आनंद द्यायची,...

प्रवाशांच्या सेवेसाठी ?

इमेज
बदल हि काळाची गरज आहे, काळानुरूप स्थित्यंतर घडतं असतात असं म्हणतात, असं ऐकिवात आहे पण काही गोष्टी त्यास अपवाद आहेत असचं म्हणावं लागेल. मी आता अपवाद गोष्टींची यादी इथे देणार नाही पण एक अनुभव मात्र नक्की शेअर करणार आहे, ज्यात मला असं दिसून आलं कि काळानुरूप त्यामध्ये बदल घडलाच नाही, किंबहुना या मंडळीना बदल स्वीकारायचाच नाही ! स्वत:चे वाहन घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन ची सेवा फार कमी वेळा घ्यावी लागली पण तरी साधारण २०१० पर्यंत राज्य परिवहन ची सेवा सातत्याने घेत आलो आहे, म्हणजे साधारण १० वर्ष झाली या सेवेपासून दूर आहे, पण लक्ष आहे (हे महत्वाचे), नुकतचं नाशिक इथे एका कार्यक्रमा निमित्त जाणे झाले आणि यावेळी खास आवर्जून राज्य परिवहन ची सेवा घेण्याचे ठरविले आणि प्रवासाचा बेत आखला. रात्री प्रवास करायचा असल्यास त्या सेवेस “रातराणी” ने प्रवास असे संबोधण्याचा राज्य परिवहनचा प्रघात आहे ! त्यानुसार आरक्षित आसनावरून प्रवास नियोजित केला आणि प्रवासाचा क्षण आला, वेळे नुसार स्थानकावर पोहोचलो आणि बस मध्ये प्रवेश करणार इतक्यात लक्ष गेले (खर तर लक्ष जायला नको होते पण काय करणार स्वभाव ! आणि स्वभावास ...

ओ मेरे दिल के चैन : मजरूह सुल्तानपुरी

इमेज
हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी गीतकार अस म्हणालो तर वावग होणार नाही, असे ‘असरार उल हसन खान’ म्हणजेच आपल्या सर्वांचे मजरूह ! एक गीतकार, उर्दू कवी म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. जवळपास सहा दशक हिंदी चित्रपट सृष्टीत योगदान देणारे मजरूह विरळच वाटतात मला, नौशाद साहेबांपासून ते पार अलिकडील अनु मलिक, जतीन-ललित, ए.आर.रेहमान या संगीतकारांसोबत देखील मजरूह यांनी गाणी दिली आहेत. १ ऑक्टोबर १९१९ मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे मजरूह यांचा जन्म झाला, म्हणूनच त्यांनी सुल्तानपुरी हे आडनाव लावलं. त्यांचे वडील पोलीस दलात हवालदार या पदावर कार्यरत होते. वडिलांची खूप इच्छा होती कि त्यांनी युनानी शिकावं आणि हकीम व्हावं तसा प्रयत्न देखील त्यांनी केला पण त्यांचा ओढा हा कविता लिहिण्याकडे होता आणि त्यांची हीच आवड त्यांना स्वप्न-नगरी मुंबई कडे घेवून आली. दरम्यानच्या काळात विविध संमेलनात सहभाग नोंदवीत घरखर्च पार पाडला जायचा. मजरूह साहेब जिगर मुरादाबादी यांना गुरु स्थानी मानत. त्यांच्याकडून शायरीचे धडे घेतले. १९४५ मध्ये एका कवी संमेलनामध्ये चित्रपट निर्माता ए.के.कारदार यांची नजर मजरूह यांच्यावर ...

ब्रेकिंग न्यूज

इमेज
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (TRP) या साठीच आपण टेलिव्हिजन समोर असतो असचं म्हणावं लागेल. कारण प्रत्येक गोष्टीत याच टी.आर.पी. साठी सगळा खेळ सुरु असतो. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात, पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार ( त्यांच्या लेखी ) कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. सगळ्यात जास्त जाहिराती कुणी दाखवीत असतील तर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया अर्थात चॅनल्स, तुम्ही पहा एखादी ब्रेकिंग न्यूज आली रे आली (आजकाल अनेक ब्रेकिंग न्यूज येतात- अगदी एकामागोमाग एक) कि हा खेळ सुरु होतो. मग एक बातमी आणि लगेच ब्रेक अस काहीतरी समीकरण असतं या मंडळींचं ! नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने कौल दिला त्याप्रमाणे सरकार स्थापन व्हायला हवं होतं आत्तापर्यंत पण नाही होवू शकलं, कारणं अनेक असतील पण या न्यूज चॅनल्स नी पार खेळ खंडोबा केला या बातमीचा , अस नाही का वाटतं तुम्हाला ?, पत्रकारिता हा लोकशाहीतील चौथा स्तंभ असे म्हणतात पण “सर्वप्रथम आम्हीच” या स्पर्धेत विश्वासार्हता हरवत चालली आहे, हे मात्र नक्की. या स्पर्धेत जर एखादी बातमी फ्लॅश झालीच आणि क...

आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके – गीतकार समीर

इमेज
बहुत खुबसुरुत गजल लिख रहा हुं, तुम्हे देखकर आजकल लिख रहा हुं|| गीतकार समीर अनजान (शीतला पांडे) यांना आपण “समीर” म्हणून ओळखतो. गीतकार अनजान यांचे चिरंजीव, एवढीच ओळख घेवून चित्रपट सृष्टीत आलेले बँक अधिकारी समीर यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख तयार केली. किंबहुना ते त्यात यशस्वी झाले असे म्हणाल्यास आतिशयोक्ती होणार नाही. सर्वात जास्त गाणे लिहिण्याचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड्स समीर यांच्या नावे आहे. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांना गौरविण्यात आले. सुरुवातीच्या काळात गाणी वडिलांकडून लिहून घेतली जातात असा आरोप त्यांच्यावर व्हायचा पण जेंव्हा संगीतकारा समोर बसून गाणी लिहली तेंव्हा सर्वाना पटलं कि “बॉलीवूड ला एक नवा गीतकार समीर” मिळाला. मनाला सोन्याची (सोना कितना सोना है) उपमा देणारा हा गीतकार म्हणजे अगदी सहज यमक जोडणारा जादुगार म्हणावा, १९८३ मध्ये गीतकार म्हणून नवी सुरुवात करणारे समीर यांनी लवकरच आशिकी या चित्रपटासाठी फिल्म-फेअर पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरले. समीर यांनी त्यांचे वडील गीतकार अनजान ,मजरूह सुलतानपुरी आणि उस्ताद आनंद बक्षी यांना गुरु स्थानी मानले. तुम दिल कि धडकन में अस म्हणत समीर ...

बदलाचे साक्षीदार व्हा, पुढाकार घ्या

इमेज
गणेशोत्सव म्हणजे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपणारी परंपरा, अर्थात आपण सगळेच हि परंपरा जपत असतो अस म्हणाल्यास वावगं होणार नाही. दरवर्षी श्री गणेशाच्या आगमनाची तयारी आणि विसर्जनाची देखील तेवढीच तयारी प्रत्येक जण यथासांग ज्याच्या त्याच्या परीने करीत असतो. हे करीत असताना विविध रूढी, परंपरा यांचा मान राखणं हि तेवढच महत्वाच असतं आणि हे संभाळणे कोणासही सांगणे न लगे ! बाप्पा येणारं म्हंटल कि घरात केलेली सजावट, रोषणाई ने घर तर फुलून जातच पण सार्वजनिक गणेशोत्सवात केलेल्या रोषणाई ने आसमंत खुलून जातो. हे दहा दिवस म्हणजे आनंद उत्सवाचे असतात, गणेशास काय हवयं, काय नकोय याकडे सगळेच लक्ष ठेवून असतात. दहा दिवसांचा पाहुणा म्हणून कि काय, त्याच्यावर असणारी श्रद्धा म्हणा नाहीतर त्याच्यावरील प्रेम म्हणा किंवा आपल्या हक्काचा , जवळचा भासणारा ईश्वर म्हणा या सगळ्यामुळे खूप काळजी घेतली जाते. परमतत्व ओंकाराचे साक्षात स्वरूप असे गणेशतत्व हे श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पृथ्वीवर मुबलक प्रमाणात असतं त्याची भक्ती केली कि त्याचा आशीर्वाद लाभतो, तोच सुखकर्ता आणि तोच दुखहर्ता त्यामुळेच आपण सर्वजण दरवर...

ये जो पब्लिक है, यह सब जानती है

इमेज
कोणत्याही प्रकारच्या राजकारणावर मत व्यक्त करण्या एवढा माझा अभ्यास नाही, पण ज्या प्रकारची परिस्थिती सध्या भारतीय राजकारणात दिसत आहेत, घडतं आहेत त्यावर व्यक्त व्हावे या उद्देशाने हा लेख प्रपंच ! ! २०१४ च्या लोकसभेत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना मताधिक्य मिळाले आणि भाजपा चे सरकार सत्तेत आले. देशास मा.नरेंद्र मोदींच्या रूपाने चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणारे पंतप्रधान मिळाले. त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडात केलेल्या कामाच्या जोरावर जनतेने पुन्हा २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने भाजपास निवडून दिले आणि पुन्हा सत्ता भाजपाचीच आली, भारताच्या इतिहासात अनेक वर्षानंतर एकाच पक्षास बहुमत मिळाले होते. मला आठवते २१ जून १९९१ मध्ये जेंव्हा मा.पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान झाले होते त्यावेळी एका जाहीर सभेत त्यांनी एक विधान केले होते, कि या देशास फक्त कॉंग्रेसच स्थिर सरकार देवू शकते आणि लोकसभेचा कार्यकाळ पुर्ण करू शकते”, पण जनतेने ज्याप्रमाणे २०१४ आणि २०१९ मध्ये कल दिला ते पाहता जनताच खरी राजा, “ये जो पब्लिक है, यह सब जानती है”, उस्ताद आनंद बक्षी यांच्या गीताप्रमाणे मा.नरसिंहराव यांचा दावा पुरता मोड...