पोस्ट्स

आजा सनम मधुर चांदनी में हम- हसरत

इमेज
  प्रख्यात गीतकार हसरत जयपुरी (इकबाल हुसेन) हिंदी चित्रपट सृष्टीस मिळालेले शीघ्र कवी वाटतात मला, "'तेरी प्यारी सुरत को, किसकी नजर ना लगे", एका लहान बाळाला पाहून सुचलेले हे शब्द ज्याचे गीतात रूपांतर झाले. तसेच एका पार्टीत एका अभिनेत्रीने परिधान केलेला पेहराव पाहून सुचलेले शब्द,  "बदन पे सितारे लपेटे हुए", या दोन्ही गीतांना परिचयाची गरज नाही, ती आजही अगदी "दिल के करीब" आहेत, मला खात्री आहे तुमच्याही ओठांवर हि गाणी असतीलच. सोबतच “चोरी चोरी” चित्रपटातील "आजा सनम मधुर चांदनी में हम", हे देखील गीत असावं.  साधारण ३५० चित्रपट आणि २००० पेक्षा जास्त गाणी सोबतच अनेक गजल, शेर त्यांच्या नावे आहेत. किशोर दा नी गायलेलं "जिंदगी एक सफर" (१९७१) अजरामर गीत असो कि "एहसान तेरा होगा मुझपर" (१९६१) रफी साहेबांचा जादुई आवाज लाभलेलं गीत, हि गीतं म्हणजे एका वेगळ्या भाव विश्वात रममाण करतात, क्लासिकल मायस्ट्रो मन्ना डे यांनी गायलेलं "आओ ट्विस्ट करें" (१९६५) हे भूत बंगला या चित्रपटातील इझी गोईंग गीत आणि तितकंच संवेदनशील "दुनिया बनानेवाले...

‘अहंकार’ हा सोडूनी द्यावा

इमेज
  लहान मुले म्हणजे देवा घरची फुले म्हणतात ,  ते उगीच नाही ,  लहान मुलांमध्ये जी निरागसता असते ती आहे तशीच राहत नाही व्यक्ती मोठा होईल तसे हि लोप पावत जाते आणि त्याची जागा  “ इगो ”  अर्थात अहंकाराने व्यापली जाते. हा  “ इगो ”  कुठेच थारा लागू देत नाही पण माणूस त्यास खूप जपतो. लहान मुलं भांडतात पण लागलीच दोस्तीही होते तसे मोठ्यांचे होते का ?  याचे उत्तर नकारार्थीच मिळते ,  असे होण्याचे कारण  “ इगो ”,  हा भावच मुळी लागलीच विचार व्यापून टाकतो ,  माणसास दुसरे काही सुचतंच नाही असे म्हणा हवे तर ,  मग हा  “ इगो ”  घेवून माणूस जिकडे जाईल तिकडे मिरवीत असतो ,  समर्थांनी दास बोधात कुविद्या लक्षण सांगताना दुसऱ्या दशकातील तिसऱ्या समासात गर्व, ताठा, अहंकार यांचा उल्लेख केला आहे आणि यापासून दूर राहण्याचा मौलिक सल्ला दिला आहे. याकडे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे जे जे सोडून देण्यास सांगितले आहे ते ते मनुष्यप्राणी अगदी घट्ट धरून ठेवतो आणि त्याचा त्रास स्वत:ला करून घेतो (अपवाद वगळता). मला वाटतं  “ इगो ” च वर्गीकरण करावं ,...

पुढच्या वर्षी ये रे लवकर .... तुझी वाट बघतोय ...

इमेज
  गणपती बाप्पा सर्वांचे श्रद्धास्थान , प्रत्येक वर्षी बाप्पाच्या आगमनाची वाट पाहणारे असंख्य भक्त आहेत. त्यापैकी मी एक ! श्री गणेश चतुर्थीला आगमन होण्याच्या काही दिवस अगोदर पासून स्वागताची तयारी आणि नंतर निरोप देण्यासाठी मनाची तयारी ! काल फेसबुक वर एक सुंदर चित्ररूपी संदेश वाचायला मिळाला (लेखकाचे नाव त्यात दिलेलं नव्हतं) आणि वाटलं “ प्रत्येकाच्याच भावना आहेत या ! ” त्यात एक मनाला स्पर्शलेला , भावलेला संदेश असा होता , “ तुझी पाठमोरी आकृती बघितली कि तू चालल्याची जाणीव मनाला होते , वाटतं तू मागे वळून बघशील.... ” पण बाप्पा ठरलेल्या दिवशी येतो आणि ठरलेल्या दिवशी त्याच्या गावाला निघतो पण जाताना आशीर्वाद नक्कीच देतो... असा प्रत्येकाचा विश्वास असतोच असतो. बाप्पाचे स्वागत करताना जोश , उत्साह कुठून येतो याचं गुपित मला अद्यापही उलगडलेलं नाही , कुठल्याही बाप्पाच्या मिरवणुकीत (या वर्षी मिरवणूक नसणार) तुम्हाला उत्साह पहायला (लहान थोर सगळ्यात हा उत्साह सारखाच) मिळेल , मग तो पारंपारिक लेझीमचा खेळ करताना असेल , झांज वाजविताना असेल अथवा एखादा वाद्यवृंद असेल , ढोल ताशा असेल , कुठून येतो हा उत्...

आय.ओ.टी. शी संबंधित स्मार्ट साधनं

इमेज
  इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयी अगोदरच लेख तुम्ही वाचला आहे, तो पुस्तकात देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज हि संज्ञा सर्व प्रथम १९९९ मध्ये एका ब्रिटीश व्यावसायिकाने अॅटो आय-डी लब मध्ये वापरली परंतु आता तज्ञांच्या मते इंटरनेट ऑफ थिंग्ज २०२० पर्यंत म्हणजे अगदी पुढच्या वर्षी पर्यंत या मध्ये २६ अब्ज वस्तूंचा समावेश असेल. इंटरनेट ऑफ थिंग्ज विविध गोष्टींचा बोध घेवून त्यांना उपलब्ध नेटवर्क पायाभूत सुविधांचा वापर करून, दूरस्थपणे (remotely) नियंत्रित करू शकेल. यामुळे वास्तविक जग आणि संगणकीय प्रणाली यांचा मेळ घालणे शक्य होणार आहे. अर्थातच याचा फायदा कार्यक्षमता वाढण्यात, अचूकपणा व आर्थिक बचत या सर्वामध्ये होणार आहे. आज मी तुम्हाला काही आय. ओ. टी. संबंधित वस्तूंची माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुमचं जग अगदी बदलून जाईल. १.     हावभाव नियंत्रण करणारे यंत्र ( Gesture Control Armband ): कोणतीही गोष्ट करायची असल्यास आपले हावभाव बदलतात, हात वारे करताना हे टिपता येवू शकतात मग तुमच्या याच हावभावा वर हे यंत्र काम करणार आहे. यात काही इलेक्ट्रोडस् (विद्युत घटाचा ध्रुव) लाव...

तंत्रज्ञानाची कमाल – टेक २

इमेज
तंत्रज्ञान जसं विकसित होतं आहे त्याप्रमाणे मानवजातीस याचा फायदाच होईल, अर्थात त्यासाठीच ते वापरलं गेलं पाहिजे. याच दरम्यान विविध संज्ञा पुढे येताना आपण पाहतो आहोत, जसं कि क्लाऊड कॉम्प्युटिंग, आय.ओ.टी.(इंटरनेट ऑफ थिंग्ज), आय.आय.ओ.टी. (इंडस्ट्रीयल इंटरनेट ऑफ थिंग्ज), ए.आय. (आर्टीफीशिएल इंटेलीजंस), या सर्व विषयांवर मी यापूर्वी लिहिलेलं आहे आणि ते ब्लॉग व माझ्या फेसबुक वॉल वर प्रकाशित देखील केलं आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा कोणतेही क्षेत्र ! विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा मुळी हा डेटाच असणार आहे असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही. हा डेटा युजर विविध कारणांनी शेयर करतो, आणि याचा वापर सॉफ्टवेअर विकासक विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी करतात.         ...

इन्कलाब झिंदाबाद

इमेज
“इन्कलाब झिंदाबाद” हा नारा शहीद भगतसिंग यांनी ८ एप्रिल १९२९ मध्ये दिल्ली विधानसभेत ब्रिटीशांचे लक्ष वेधण्यासाठी जेंव्हा बॉम्बस्फोट (रिकाम्या बाकावर) केला तेंव्हा दिला , हे आपण सगळेच जाणतो. स्वतंत्रता मिळविणे , नव चेतना जागविणे हेतूने, एक संघता राखण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी हा नारा दिला. अनेकांनी प्राणाची आहुती दिली मग या देशास स्वातंत्र्य मिळाले. “इन्कलाब झिंदाबाद” याचा इंग्रजी मध्ये अर्थ होतो, “Long Live Revolution” ज्यास हिंदीत “क्रांती अमर रहे” असे म्हंटले जाते. प्रत्यक्षात “इन्कलाब झिंदाबाद” हा नारा उर्दू कवी व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहनी यांनी १९२१ मध्ये सर्व प्रथम लिहिला. याचा वापर भगतसिंग यांनी १९२९ मध्ये केला. १९१७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर भारतात क्रांतीचे वारे वाहू लागले होते,आर्यलंडच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांनी त्यांना स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले होते, आता हाच धागा भारतातील तरुणांनी पकडला आणि बदलाचे वारे वाहू लागले. १९१८ साली प्रथम जागतिक युद्धाच्या समाप्ती नंतर भारतात असंतोष पसरू लागला होता, लोग रस्त्यावर उतरू लागले होते. या जागतिक युद्धात भारतीय...

गीग इकॉनॉमी म्हणजे काय ?

इमेज
भारतात हि एक नवी अर्थव्यवस्था म्हणून वाढत आहे. विविध सेवा मागणारा एक वर्ग आणि त्या सेवा पुरविणारा दुसरा वर्ग असे या गीग इकॉनॉमी मध्ये म्हंटले जाते. ज्यास आपण टास्क बेस्ड इकॉनॉमी अस संबोधू. पण गीग म्हणजे काय तर एखादी सेवा पूर्ण करणारा एक व्यक्ती अथवा त्याच्या सारखे अनेक व्यक्ती जे एखाद्या सेवेसाठी पुढाकार घेतात आणि ती सेवा पूर्ण करतात. एखादं उदाहरण घेऊया, सुरेशला त्याच्या कंपनीच्या प्रमोशन साठी मार्केटिंग करणे हेतू सेवा घ्यायच्या आहेत, तर त्यास यामध्ये मदत करणारा एक वर्ग जो त्याचा कर्मचारी नाही पण तो /ती सेवा देण्यास समर्थ आहे असे त्यास सेवा देतील (सेवेची किमत हि बोली लावून अथवा जाहीर करून करता येते.) आणि त्या सेवेच्या मोबदल्यात आर्थिक उलाढाल होईल. ज्यास फ्री लान्सिंग असं म्हणतात, म्हणजे सेवा पुरविणारा / देणारा  होण्याकडे भारतात कल वाढतो आहे, कारण हा नऊ ते पाच असा जॉब नाही ठरू शकतं, सेवा देणारा त्याच्या सोईने सेवा पूर्ण करू शकतो फक्त ठरलेल्या वेळेत ती पूर्ण करणे यास महत्व देण्यात येते, आणि मला वाटतं ते आवश्यक आहे.           संपूर्ण जग...