आजा सनम मधुर चांदनी में हम- हसरत
प्रख्यात गीतकार हसरत जयपुरी (इकबाल हुसेन) हिंदी चित्रपट सृष्टीस मिळालेले शीघ्र कवी वाटतात मला, "'तेरी प्यारी सुरत को, किसकी नजर ना लगे", एका लहान बाळाला पाहून सुचलेले हे शब्द ज्याचे गीतात रूपांतर झाले. तसेच एका पार्टीत एका अभिनेत्रीने परिधान केलेला पेहराव पाहून सुचलेले शब्द, "बदन पे सितारे लपेटे हुए", या दोन्ही गीतांना परिचयाची गरज नाही, ती आजही अगदी "दिल के करीब" आहेत, मला खात्री आहे तुमच्याही ओठांवर हि गाणी असतीलच. सोबतच “चोरी चोरी” चित्रपटातील "आजा सनम मधुर चांदनी में हम", हे देखील गीत असावं. साधारण ३५० चित्रपट आणि २००० पेक्षा जास्त गाणी सोबतच अनेक गजल, शेर त्यांच्या नावे आहेत. किशोर दा नी गायलेलं "जिंदगी एक सफर" (१९७१) अजरामर गीत असो कि "एहसान तेरा होगा मुझपर" (१९६१) रफी साहेबांचा जादुई आवाज लाभलेलं गीत, हि गीतं म्हणजे एका वेगळ्या भाव विश्वात रममाण करतात, क्लासिकल मायस्ट्रो मन्ना डे यांनी गायलेलं "आओ ट्विस्ट करें" (१९६५) हे भूत बंगला या चित्रपटातील इझी गोईंग गीत आणि तितकंच संवेदनशील "दुनिया बनानेवाले...