पोस्ट्स

ट्रेंडस् – लाख मोलाची गोष्ट

इमेज
  टेलिव्हिजन पाहताना टी. आर.पी. ला महत्व असतं आणि त्याची पूर्ण काळजी इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील मंडळी घेत असतात, तो कसा वाढेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन असतात. आजकाल विविध न्यूज / करमणूक वाहिन्यांचा टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टी.आर.पी.) वर सगळा खेळ सुरु आहे. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात , पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार  ( त्यांच्या लेखी )  कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. मला तरी वाटतं याविषयावर कुणी शोध निबंध देखील लिहू शकेल , असो आजचा हा विषय नाही, तसाच काहीतरी “ट्रेन्डीग” हा प्रकार इंटरनेट वर सापडतो, आज काय ट्रेन्डीग आहे अथवा काय होऊ शकेल याकडे काही मंडळी जाणीवपूर्वक कामात असतात, “ट्रोल” करणं हा सोशल मीडिया मधील एक भाग, पण “ट्रेंडस्” तुम्हाला विविध सर्च इंजिनवर काय हुडकलं गेल आहे ते दाखवितं.            जसे की “गुगल” या सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या सर्च इंजिनवर (इतरही सर्च इंजिन आहेत जसे की, बिंग, अल्टा विस्टा ( आता याहू ) ,   askjeeves.com इ...

अर्थ करी समर्थ – समर्थ सहकारी बँक

इमेज
  समर्थांनी आत्मज्ञानास प्रगट करण्याचा सर्वोत्तम मार्ग निवडून ज्ञान भांडार सर्व सामान्यास उपलब्ध करून दिले आहे. मानवात ज्ञान आणि कर्तृत्व या दोन अंगांचा विलास स्पष्ट होतो. यातील ज्ञानांगाला मंगलमूर्ती म्हणतात व कर्तुत्व अंगाला शारदा म्हणतात. दिसायला दोन वाटणारी अंगे मुळात एकच असतात. म्हणूनच ज्ञान व कर्म, सिद्धांत व व्यवहार, विचार आणि आचार यांचा अविरोध असणारे हे उत्तम लक्षण समजले जाते. समर्थ म्हणतात , “कुबेरापासूनी अर्थ | वेदांपासूनी परमार्थ | लक्ष्मीपासून   समर्थ | भाग्यासी आले ||” अर्थात कुबेर संपत्तीचे, वेद परमार्थाचे, लक्ष्मी ही भाग्य आणि सामर्थ्याचे मूळ होय. हेच ब्रीद आणि आचरण घेऊन समर्थ सहकारी बँकेची 3000 कोटी पेक्षा जास्त मिश्र व्यवसाय साध्य करीत वाटचाल सुरू आहे.                  " अर्थ करी समर्थ" हे ब्रीद घेवून सोलापुरच्या जड़ण-घडणीत मोलाचे योगदान देणारी बैंक म्हणजे "समर्थ सहकारी बैंक". समर्थांची शिस्तच जणू प्रत्येक कर्मचाऱ्यात पहायला मिळते. दासबोधात सांगितल्याप्रमाणे , " आधी कर्माचा प्रसंग , कर्म केले पाहिजे सांग , या समर्थान...

कर्मचारी संबंध- चार मुलभूत आधारस्तंभ

इमेज
  कोणत्याही संस्थेसाठी / कंपनीसाठी त्याचा कर्मचारी हा अॅसेट असतो. त्याच्या सहकार्याने संस्था/ कंपनी पुढे वाटचाल करीत असते. कर्मचारी वर्गासोबत असणारे नाते हे कंपनीच्या / संस्थेच्या फायद्याचे ठरत असते. अनेक उदाहरणातून हे सिद्ध झाले आहे कि जिथे कर्मचारी वर्ग आनंदी असतो तिथे उत्पादन/ विक्री उत्तम होते. पण कर्मचारी वर्गसोबत नाते संबंध प्रस्थापित करणे आणि सोबत एक लक्ष्मण रेषा आखून ठेवणे हे देखील तितकच महत्वाच असतं, हे ज्यांना जमलं त्यांना व्यवसायातील महत्वाची बाब जमली असे मी म्हणेन. तुमच्या कंपनीची काम करण्याची एक सिस्टम हवी, त्या सिस्टमनी  तुमची कंपनी चालली पाहिजे, हे ध्यानात घ्यायला हवे, बऱ्याच वेळा काय होतं, कर्मचारी त्यांच्या सोई प्रमाणे काम करतात आणि मग अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ मालकावर येते, असं होऊ नये त्यासाठी सिस्टम तयार करा.           कंपनीतील कर्मचारी वर्गा सोबत कंपनीचे कंत्राट, भावनिक, व्यावहारिक स्वरुपात संबंध प्रस्थापित होवू शकतात, यातील प्रत्येक पैलूस महत्व द्यायला हवे. एक चांगला कर्मचारी संबंध कार्यक्रम हे सुनिश्चित ...

नो युवर कस्टमर – ग्राहक ओळखा

इमेज
  व्यवसायात यशस्वी व्हायचं असल्यास, ग्राहक ओळखणे हि कला आत्मसात करणे आवश्यक आहे. यास कला म्हणणेच योग्य होईल कारण जर ग्राहक आहे तर व्यवसाय आहे, हे साध सोप गणित आपल्या लक्षात यायला हवं, नाही का? एखाद्या व्यवसायाचं यश, अपयश हे फक्त ग्राहक ओळखता न येणं एवढ्यावर अवलंबून असू शकतं. ग्राहकास काय हवं हे जर आपण जाणलं (यासाठी स्वत: ग्राहक होण फायदेशीर होवू शकतं) तर आपण त्याचे उपाय तयार करू शकतो, विविध सेवा उपलब्ध करून देवू शकतो. व्यवसाय जिथे सुरु करायचा आहे तेथील लोकसंख्या शास्त्र आपल्याला बरीच मदत करू शकतं, तेच आपले ग्राहक होणार आहेत त्यामुळे तेथील लोकांच्या गरजा, विविध सेवांप्रती त्यांचे वर्तन आणि उत्पादनाच्या किमती विषयी असणारी संवेदनशीलता याचा अभ्यास व्यवसायाचे विपणन (मार्केटिंग) करण्याकामी मदतगार ठरू शकतो. ग्राहकास समजून घेणं यामध्ये त्याच्या मुलभूत, सामाजिक, भावनिक, विशिष्ट कार्यासबंधी असणाऱ्या गरजा लक्षात घेणं आवश्यक असतं. आपल्या ग्राहकांसाठी आपण जितके अधिक मूल्य तयार करू शकता तेवढे आपण व्यवसायात यशस्वी व्हाल.        ग्राहकास काय हवं याचा अभ्यास झाला कि त्याची टॅब्...

गुरुपौर्णिमा

इमेज
  अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥ ज्ञानरूपी किरणाने जे अज्ञानरूपी अंधकाराने आंधळे झालेल्यांचे डोळे उघडतात त्या गुरूंना नमस्कार | आज गुरुपौर्णिमा, गुरुप्रति आदर व्यक्त करण्याचा आणि आभार मानायचा दिवस , गुरुपौर्णिमेस एक आध्यात्मिक परंपरा आहे , गुरु - ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मिळते , आई व वडील हे आपले प्रथम गुरु , ज्यांनी आपल्याला घडवलं , आपल्या पायावर ताठ मानेने उभं कसं रहावे हे शिकवलं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे दोन्ही गुरु असतात. आई हि सदैव मुलांची लाडकी असते , काही झाल तरी मुलांना आई लागते , त्या माऊलीच हि सर्वस्व असतात तिची मुलं. आई चं मुलां शिवाय विश्वच नाही अस म्हणालो तरी वावगं होणार नाही , अर्थात मुलांसाठी सुद्धा आईच विश्व आहे. या गुरूचे मार्गदर्शन माझ्या नशिबाने मला आजही मिळते आहे आणि मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! पण माझे बाबा आज या जगात नाहीत. ते फक्त आठवणींच्या रुपात माझ्या सोबत आहेत. बाबांनी कृतीतून बऱ्याच गोष्टी शिकविल्या , त्या जेंव्हा पाहिल्या तेंव्हा त्याचे महत्व समजून घेता आलं नाही पण आज जेंव्हा ते...

स्टार्टअप सक्सेस मंत्र- टेक २

इमेज
  मला आशा आहे, की तुम्ही स्टार्टअप सक्सेस मंत्र भाग १ वाचला असावा. त्यामध्ये मी पंच सूत्री दिल्या आहेत आणि या भागात देखील पुढील पंच सूत्री विषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. हा “दस का दम”, दशसूत्री म्हणा फार तर तुम्हास तुमच्या स्टार्टअपला यशस्वी करण्यात मदतगार ठरतील हे नक्की. याचा अंमल करणं कठीण आहे मलाही माहिती आहे, मागील २१ वर्षांपासून मी ही व्यवसाय करीत आहे. त्यामुळे या सूत्रींच्या कसोटीची पारख मी केलेली आहे. त्याचा जवळून अनुभव घेतला आहे. अनुभवांचे बोल म्हणा फार तर पण ही उद्योग संस्कृती स्विकारायचं एकदा नक्की केलं की त्यावर ठाम रहा, चालत रहा. आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पहावं आणि शिकावं, स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प महाराजांनी असंख्य मावळ्यांच्या साथीने सिद्धीस नेला अगदी तसचं स्वत:चा स्टार्टअप एक यशस्वी उद्योग म्हणून नावारुपास आणायचा असल्यास परिश्रम आलेच. निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी , तुमच्या स्टार्टअप प्रवासात हा मंत्र लक्षात ठेवावा असे मी सुचवेन. समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती श...

समांतर

इमेज
               शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण या लेखाचा आणि वेब सिरीजचा काहीही संबंध नाही, पार दूरवर संबंध नाही. विचारांची दिशा, इतिहासाची पुनरावृत्ती म्हणू फार तर आपल्याच सोबत होताना आपण पाहू शकतो त्यास कोणताही कुमार महाजन किंवा सुदर्शन चक्रपाणी व्हायची गरज नाही. संगीत आपल्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक, फक्त काळानुरूप ते बदलत गेलं तसं ते उपलब्ध होण्याची सिस्टम देखील बदलत गेली आणि अजून खूप प्रकारची स्थित्यंतर घडतील आणि नवीनच चांगल काहीतरी पहायला, ऐकायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्याक्षिक करण्याचे कसब संगीतकारांकडे आपण पाहतो. पंचमदा अशा संगीतकारांपैकी एक, मग ते कंगवा फिरवून निर्माण होणारं संगीत, काचेचे ग्लास वाजवून तयार होणारं संगीत असेल अथवा आणखी कोणता प्रकार , सगळी जादूच !! रमेश सिप्पींच्या शोले या चित्रपटाचा रिमेक “आग” या नावाने राम गोपाल वर्मा ने तयार केला (जो बॉक्स ऑफिसवर जबरदस्त आपटला) त्यास गणेश हेगडे, प्रसन्न शेखर या जोडीने संगीत दिले होते आणि बॅकग्राउंड स्कोर अमर मोहिले याच होतं, त्यांना जुन्या शोले ...