पोस्ट्स

“आदर्श” बनण्याचा क्यु-आर कोड

इमेज
  आजच्या लेखांमध्ये वापरण्यात आलेला क्यु-आर कोड, आदर्श असा अर्थबोध देतो, तो फक्त स्कॅन करून “आदर्श” होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं, नाही का? ज्यास आदर्श व्यक्ति व्हायचं आहे त्याने क्यु-आर कोड स्कॅन करावा, पण असे होत नाही, असे करता येत नाही, मग आदर्श बनण्याचा क्यु-आर कोड नक्की काय आहे? हे आजच्या लेखात पाहुयात..   आयुष्यात आपण कुणाचा आदर्श होऊ म्हणून कुणी त्यासाठी परिश्रम करीत नाहीत, आदर्श बनतात ते त्यांनी जपलेल्या नैतिक मूल्यां मुळे, केलेल्या सामाजिक योगदान आणि दूरदृष्टि मुळे , त्यांचा नवीन तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सर्वात महत्वाचं म्हणजे गरुडझेप घेण्याची जिद्द या सर्व बाबी मुळे एक आदर्श व्यक्तिमत्व घडतं , लोक आजकाल फक्त लाईम लाइटच्या झगमगाटास भुलतात आणि त्यासच आदर्श मानू लागतात. जे सर्वस्वी चुकीचे आहे. अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर ज्यांनी विश्वशांती साठी प्रार्थना १३ व्या शतकात लिहून ठेवली होती जी आजही प्रेरणा देते. अवघ्या हिंदुस्थानाचे अखंड प्रेरणा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज- आजही त्यांची शिकवण , त्यांचे विचार धीरोदात्त मानू...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स

इमेज
  आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत , वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज साजरी करीत असताना आपण महाराजांकडून विविध कौशल्य शिकून त्यानुसार राष्ट्र उभारणीत योगदान देण्यास पुढे यावे. जयंती साजरी करताना आपण त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे मला वाटते. महाराजांकडे पहावं आणि शिकावं , स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प महाराजांनी असंख्य मावळ्यांच्या साथीने सिद्धीस नेला पण हे करीत असताना जी जीवनावश्यक कौशल्य महाराजांनी आपणास दिली त्याच अनुसरणं करावं. श्री समर्थ रामदासस्वामींनी महाराजां विषयी भावना व्यक्त करताना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत- निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी. संस्कृतीचा आदर करा: छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मराठी आणि संस्कृत या भाषांना राजभाषेचा दर्जा दिला. आपली संस्कृती टिकविण्यासाठी स्थानिक भाषेचे महत्व महाराजांनी अधोरेखित केले आहे. सोबतच समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद सुलभ होण्यास यामुळे मदत मिळाली.       ...

यश म्हणजे साध्य, सिद्धी अन् प्रगती- भाग -२

इमेज
  मागील भागात यश म्हणजे काय? या विषयी मार्गदर्शन केले त्याचाच भाग म्हणून पुढे मार्गदर्शन करीत असताना हे यश कसे साध्य करावं यां विषयी अधिक माहिती यां लेखात देत आहे. तसे पाहिले तर यशाची व्याख्या व्यक्ति परत्वे बदलते पण तरी देखील विविध तज्ञ मंडळींनी केलेली यशाची व्याख्या आपल्याला जीवनात पुढे जाण्यास मदत करते. यश म्हणजे मन:शांती अशीही व्याख्या करता येऊ शकते, जीवनात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्ही केलेले सर्वोत्तम प्रयत्न म्हणजे यश !! अमेरिकन तत्वज्ञानी इमर्सन याने केलेली यशाची व्याख्या आपल्याला सांगते- आनंदात राहणे, हसणे, हुशार लोकांचा आदर करणे, इतरामध्ये सर्वोत्तम शोधणे, जगाला तुमच्याकडील उत्तम देणे, जीवन सुलभ आहे , जे तुम्ही जगला आहात ते म्हणजे यश आहे. हे कसे साध्य होऊ शकेल यां विषयी मागील भागात मार्गदर्शन केलेले आहे आज याच विषयी अधिक जाणून घेऊया: १.       भावनिक बुद्धिमत्ता: एकूणच बुद्धिमत्ता हे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविण्यासाठी योगदान देणारा एक घटक असल्याचे मानले जात आहे. परंतु काही तज्ञानी असे सुचविले आहे की भावनिक बुद्धिमत्ता प्रत्यक्षा...

यश म्हणजे साध्य, सिद्धी, प्रगती

इमेज
  तसे पाहिले तर यशाची व्याख्या करणं कठीण, कारण प्रत्येकाची यशाची व्याख्या          वेग-वेगळी असू शकते, नव्हे असतेच. तुमच्या जीवनातील ध्येयापर्यंत पोहोचण्याची क्षमता म्हणून देखील आपण याकडे पाहू शकतो. मला वाटतं यशासाठी चांगला शब्द म्हणजे साध्य, सिद्धी किंवा प्रगती असा असू शकतो. हा एक प्रवास आहे जो तुमची भरभराट / उत्कर्ष होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संसाधने विकसित करण्यास मदत करतो. यशाची व्याख्या सहसा जीवनात तुमची वैयक्तिकरित्या सांगितलेली उद्दिष्टे पूर्ण करणे अशी केली जाते. कारण उद्दिष्टे स्वत:च तयार केली जातात, ती पूर्ण केली की लोक त्यास यश म्हणून पाहतात, आणि हे त्यांच्या गरजा, ध्येय आणि महत्वाचं परिस्थिती नुसार बदलू शकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध कल्पना, युक्त्या लढवल्या जाऊ शकतात परंतु तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्य करणारी रणनीती तुमच्यासाठी यशाचा अर्थ काय यावर अवलंबून असू शकते. तुम्ही जिथे कामास आहात अथवा तुमचे स्वत:चे स्टार्टअप आहे तर या ठिकाणी उत्तम काम करणे, उत्तम व्यवसाय मिळविणे अथवा नोकरीस असल्यास पगारा बाबत उत्तम पगार मिळविण...

बिझनेस मॉडेल

इमेज
  स्टार्टअप मध्ये बिझनेस मॉडेलचे महत्व स्टार्टअप मध्ये बिझनेस मॉडेल खूप महत्वाची भूमिका पार पाडतं त्याविषयी आजच्या लेखात मार्गदर्शन करणार आहे. स्वत:चा व्यवयसाय / कंपनी स्थापन करणे आणि त्या माध्यमातून रोजगार उपलब्धी करणे ही काळाची गरजच आहे, त्यावर युवक वर्गाने नक्की विचार आणि कृती करावी असे मला वाटतं. नवीन व्यवसायाची सुरुवात करीत असताना अनेक बाबी असतात ज्यावर व्यवसाय अवलंबून असतो, प्रॉफिट कसा कमवावा त्यासाठी आवश्यक असणारं बिझनेस मॉडेल कसं आहे? ते तयार केलेलं आहे का? नसल्यास ते तयार करण्यास घ्या, आणि व्यवसायात प्रॉफिट कमवा. नवीन आणि प्रस्थापित दोन्ही व्यवसायांसाठी बिझनेस मॉडेल महत्वाचे. प्रस्थापित व्यवसायांनी त्यांच्या व्यवसाय योजना नियमितपणे अपडेट केल्या पाहिजेत अन्यथा पुढील ट्रेंड आणि आव्हानांचा अंदाज घेण्यात तुम्ही अपयशी होऊ शकता. बिझनेस मॉडेल्स गुंतवणूकदारांना त्यांना स्वारस्य असलेल्या कंपन्यांचे मूल्यांकन करण्यात मदत करतात. म्हणून बिझनेस मॉडेलना अनन्यसाधारण असे महत्व आहे. कृपया हे ध्यानात घ्या: §   बिझनेस मॉडेल हे कंपनीचे फायदेशीर व्यवसाय करणेचे मुख्य धोरण आहे. ...

एक “आयडिया” जी बदलेलं तुमचं जीवन

इमेज
  परिचित शीर्षक वाटला असावा , हो ना? पण स्टार्टअप मध्ये आयडियाला खूप महत्व आहे, आता ही आयडिया आणायची कुठून यासाठी बरीच ऑनलाइन साधनं उपलब्ध आहेत पण मी म्हणेन तुम्ही तुमच्या अवती-भवती पहा, समाजात जा तिथे लोकांना कोणत्या समस्या आहेत हे जाणून घ्या, ज्यास आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट असं म्हणू , या स्टेटमेंटला तुमच्याकडे सोल्यूशन / उत्तर असल्यास तुमची सुरुवात झाली असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. अर्थात फक्त सोल्यूशन देऊ करणं म्हणजे स्टार्टअप असे नाही. त्यास प्रमाणित करावं लागेल, त्याची व्यवहार्यता तपासावी लागेल यामध्ये जर तुमचं सोल्यूशन यशस्वी झालं तर तुम्ही एक उत्तम स्टार्टअप करू शकाल. या मार्गदर्शन मालिकेत या पूर्वी मी “प्रमाणित कल्पना” यां विषयी माहिती दिलेली आहे. आजकाल विविध ठिकाणी आयडियाथॉनच्या माध्यमातून विविध डोमेन वरुन अनेक समस्या विधाने दिली जातात किंवा उमेदवारास स्वत:चे समस्या विधान स्वत: निवडण्याचे स्वातंत्र्य देऊ करण्यात येते, त्यांनी निवडलेल्या समस्येचे पूर्ण निराकरण १६-१८ तासांच्या आत करणे क्रमप्राप्त असते. यात महत्वाचं अंमलबजावणी आवश्यक नसली तरी पेपरवर उमेदवाराचा संपूर्ण दृष्टि...

आउट ऑफ द बॉक्स

इमेज
  “आउट ऑफ द बॉक्स” हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण तसे करायचे म्हणजे नक्की काय करायचं? असं कोणतंही मापक, दंडक नाही, हे कुठेही शिकवलं जात नाही. पण हे एक कौशल्य ज्यास जमतं तो जीवनात यशस्वी होतो हे नक्की !! स्टार्टअप मध्ये देखील आउट ऑफ द बॉक्स विचारांना अनन्य साधारण असे महत्व आहे. शेवटी तुमच्या कल्पनेस तुम्ही किती आणि कसा वाव देऊ करता त्याची सत्यता कशी प्रस्थापित करता यावरच तुमचं यश अवलंबून असतं. चौकटी बाहेरचा विचार तुमचे क्षितिज विस्तारण्यास मदत करतो, त्यातून धोक्याची आणि संधीची जाणीव तुम्हास होऊ शकते. धोरणात्मक दृष्टी मुळे नफा आणि तोटा या दोन्ही बाजू समजून घेण्यास तुम्ही सक्षम होता आणि महत्वाचं सक्रिय राहता. आव्हानात्मक समस्या सोडविताना अस्तित्वात नसलेली उत्तरं शोधण्यासाठी स्वत:च्या वैचारिक सीमांच्या पलीकडे/ पुढे पाहण्याची संधी तुम्हास मिळते. चौकटी बाहेरचा विचार करणे याचा अर्थ असा की तुम्ही, तुमच्या इच्छित परिणामा पर्यन्त पोहोचण्यासाठी विविध उपाय आणि पद्धती विचारात घेण्यास इच्छुक आहात. वेगळ्या पद्धतीने विचार करण्याने तुमच्या करिअरवर याचा योग्य सकारात्मक परिणाम होऊ शकतो. लक्षात ठेवा, जेंव...