पोस्ट्स

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

इमेज
  ब्रिटिश काळात राजकीय चळवळ जनसामान्यां पर्यन्त पोहोचावी यासाठी विविध मार्ग शोधण्याची निकड वाटू लागली असता टिळकांचे लक्ष गणपती बाप्पा कडे गेले आणि त्यांनी गणेश उत्सव सार्वजनिक रित्या साजरा करणेचे ठरविले आणि त्याकाळात पुण्यातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या सहकार्याने उत्सवास सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. यास ठोस अशी कारणं देखील होती, त्याकाळातील भाषा माध्यम इंग्रजी आणि त्याची व्याप्ती खूप कमी , सोबतच सामान्य माणसास ब्रिटिश जुलमी राजवटी विरोधात जन-जागृती करणे , त्यांच्या भाषेत त्यांना विषय समजावा त्यासाठी जमाव जमविणे खूप कठीण, कॉंग्रेस मध्ये मवाळ नेतृत्व ज्यांचा भर हा पत्रव्यवहार, निवेदनं देणं यावर असायचा परंतु टिळकांना हे मान्य नव्हतं त्यासाठी त्यांनी उत्सवास सार्वत्रिक स्वरूप देण्याचे निश्चित केले. पेशवे काळा पासून उत्सव साजरे केले जायचेच. पण ते सार्वजनिक नव्हते.   ही पार्श्वभूमी प्रथम मांडण्याचे कारण म्हणजे सार्वत्रिक उत्सवाची गरज आणि त्यामागची भूमिका- स्वातंत्र्यपूर्व काळात काय होती आणि आता काय आहे? थोडा विचार केल्यास स्वातंत्र्यानंतर या सार्वत्रिक उत्सवाची खरीच गरज आहे का? क...

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

इमेज
  संगणकीय जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता नवे नवे प्रयोग करताना आता आपल्याला पहायला आणि अनुभवाला मिळत आहे. येणाऱ्या पिढीला याचा खूप फायदा होवू शकेल अस वाटते. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा जिथे गरज असेल ते क्षेत्र ! सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा हा डेटाच असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाला मिळालेली नवी देणगी आहे याच्या जोरावर बरेच प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. तस पाहिलं तर आरोग्यसेवा हि मनुष्यबळावर अवलंबून आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता योग्यरीत्या वापरली गेल्यास, या क्षेत्रास त्याचा खूप मोठा फायदा होताना पहायला मिळेल. संशोधक, शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स यांची एक टीमच या विषयावर कार्यरत आहे नक्कीच हि मंडळी एका नव्या ए.आय. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्य...

झेप- मुलं मोठी होतात

इमेज
  आयुष्याच्या वाटेवर चालत असताना काळ कसा सरतो समजत नाही, ‘काळच’ बऱ्याच गोष्टीवर मलम असतो, सोल्यूशन असतं अर्थात याची उपरती प्रौढ झाल्यावर होते आणि तो आजचा विषयही नाही. बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धावस्था अशा अवस्थेतून वाटचाल, म्हंटल तर “दिव्य” म्हंटल तर “आनंद”, प्रत्येकजण यास कसे पाहतो त्यावर सारं अवलंबून असतं असं म्हणावं लागेल. वडील आणि आई यांच्या छत्र छायेत दिवस मजेत सरत असतात ते कधीच संपू नयेत असे प्रत्येकास वाटते, पण तुम्ही जबाबदारी घेण्यास सक्षम होता – तुम्ही सक्षम झालात हे ठरवायचं कसे? याचं कोणतच मापक , दंडक नाही. आजच्या जमान्यात शहरा -शहरा परत्वे मुलांचे संगोपन यात बदल होत आहेत. मुलांना मिळणाऱ्या सुविधा, सभोवतालचे वातावरण यावर बरचं काही अवलंबून असतं. आयुष्यात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध वळणावर निर्णायक टप्पे येतात त्याकडे पाहण्याचा विविध शहरातील मुलांचा दृष्टिकोन बदलतो आहे. याकडे एक पालक म्हणून पाहताना भिती वाटते, पण मुलांमध्ये दिसणारा आत्मविश्वास आश्वस्थ करतो की ही मंडळी काहीतरी वेगळ करून दाखवतील.            ...

“आदर्श” बनण्याचा क्यु-आर कोड

इमेज
  आजच्या लेखांमध्ये वापरण्यात आलेला क्यु-आर कोड, आदर्श असा अर्थबोध देतो, तो फक्त स्कॅन करून “आदर्श” होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं, नाही का? ज्यास आदर्श व्यक्ति व्हायचं आहे त्याने क्यु-आर कोड स्कॅन करावा, पण असे होत नाही, असे करता येत नाही, मग आदर्श बनण्याचा क्यु-आर कोड नक्की काय आहे? हे आजच्या लेखात पाहुयात..   आयुष्यात आपण कुणाचा आदर्श होऊ म्हणून कुणी त्यासाठी परिश्रम करीत नाहीत, आदर्श बनतात ते त्यांनी जपलेल्या नैतिक मूल्यां मुळे, केलेल्या सामाजिक योगदान आणि दूरदृष्टि मुळे , त्यांचा नवीन तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सर्वात महत्वाचं म्हणजे गरुडझेप घेण्याची जिद्द या सर्व बाबी मुळे एक आदर्श व्यक्तिमत्व घडतं , लोक आजकाल फक्त लाईम लाइटच्या झगमगाटास भुलतात आणि त्यासच आदर्श मानू लागतात. जे सर्वस्वी चुकीचे आहे. अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर ज्यांनी विश्वशांती साठी प्रार्थना १३ व्या शतकात लिहून ठेवली होती जी आजही प्रेरणा देते. अवघ्या हिंदुस्थानाचे अखंड प्रेरणा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज- आजही त्यांची शिकवण , त्यांचे विचार धीरोदात्त मानू...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स

इमेज
  आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत , वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज साजरी करीत असताना आपण महाराजांकडून विविध कौशल्य शिकून त्यानुसार राष्ट्र उभारणीत योगदान देण्यास पुढे यावे. जयंती साजरी करताना आपण त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे मला वाटते. महाराजांकडे पहावं आणि शिकावं , स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प महाराजांनी असंख्य मावळ्यांच्या साथीने सिद्धीस नेला पण हे करीत असताना जी जीवनावश्यक कौशल्य महाराजांनी आपणास दिली त्याच अनुसरणं करावं. श्री समर्थ रामदासस्वामींनी महाराजां विषयी भावना व्यक्त करताना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत- निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी. संस्कृतीचा आदर करा: छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मराठी आणि संस्कृत या भाषांना राजभाषेचा दर्जा दिला. आपली संस्कृती टिकविण्यासाठी स्थानिक भाषेचे महत्व महाराजांनी अधोरेखित केले आहे. सोबतच समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद सुलभ होण्यास यामुळे मदत मिळाली.       ...

यश म्हणजे साध्य, सिद्धी अन् प्रगती- भाग -२

इमेज
  मागील भागात यश म्हणजे काय? या विषयी मार्गदर्शन केले त्याचाच भाग म्हणून पुढे मार्गदर्शन करीत असताना हे यश कसे साध्य करावं यां विषयी अधिक माहिती यां लेखात देत आहे. तसे पाहिले तर यशाची व्याख्या व्यक्ति परत्वे बदलते पण तरी देखील विविध तज्ञ मंडळींनी केलेली यशाची व्याख्या आपल्याला जीवनात पुढे जाण्यास मदत करते. यश म्हणजे मन:शांती अशीही व्याख्या करता येऊ शकते, जीवनात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्ही केलेले सर्वोत्तम प्रयत्न म्हणजे यश !! अमेरिकन तत्वज्ञानी इमर्सन याने केलेली यशाची व्याख्या आपल्याला सांगते- आनंदात राहणे, हसणे, हुशार लोकांचा आदर करणे, इतरामध्ये सर्वोत्तम शोधणे, जगाला तुमच्याकडील उत्तम देणे, जीवन सुलभ आहे , जे तुम्ही जगला आहात ते म्हणजे यश आहे. हे कसे साध्य होऊ शकेल यां विषयी मागील भागात मार्गदर्शन केलेले आहे आज याच विषयी अधिक जाणून घेऊया: १.       भावनिक बुद्धिमत्ता: एकूणच बुद्धिमत्ता हे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविण्यासाठी योगदान देणारा एक घटक असल्याचे मानले जात आहे. परंतु काही तज्ञानी असे सुचविले आहे की भावनिक बुद्धिमत्ता प्रत्यक्षा...

यश म्हणजे साध्य, सिद्धी, प्रगती

इमेज
  तसे पाहिले तर यशाची व्याख्या करणं कठीण, कारण प्रत्येकाची यशाची व्याख्या          वेग-वेगळी असू शकते, नव्हे असतेच. तुमच्या जीवनातील ध्येयापर्यंत पोहोचण्याची क्षमता म्हणून देखील आपण याकडे पाहू शकतो. मला वाटतं यशासाठी चांगला शब्द म्हणजे साध्य, सिद्धी किंवा प्रगती असा असू शकतो. हा एक प्रवास आहे जो तुमची भरभराट / उत्कर्ष होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संसाधने विकसित करण्यास मदत करतो. यशाची व्याख्या सहसा जीवनात तुमची वैयक्तिकरित्या सांगितलेली उद्दिष्टे पूर्ण करणे अशी केली जाते. कारण उद्दिष्टे स्वत:च तयार केली जातात, ती पूर्ण केली की लोक त्यास यश म्हणून पाहतात, आणि हे त्यांच्या गरजा, ध्येय आणि महत्वाचं परिस्थिती नुसार बदलू शकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध कल्पना, युक्त्या लढवल्या जाऊ शकतात परंतु तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्य करणारी रणनीती तुमच्यासाठी यशाचा अर्थ काय यावर अवलंबून असू शकते. तुम्ही जिथे कामास आहात अथवा तुमचे स्वत:चे स्टार्टअप आहे तर या ठिकाणी उत्तम काम करणे, उत्तम व्यवसाय मिळविणे अथवा नोकरीस असल्यास पगारा बाबत उत्तम पगार मिळविण...