पोस्ट्स

आय.ओ.टी. शी संबंधित स्मार्ट साधनं

इमेज
  इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयी अगोदरच लेख तुम्ही वाचला आहे, तो पुस्तकात देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज हि संज्ञा सर्व प्रथम १९९९ मध्ये एका ब्रिटीश व्यावसायिकाने अॅटो आय-डी लब मध्ये वापरली परंतु आता तज्ञांच्या मते इंटरनेट ऑफ थिंग्ज २०२० पर्यंत म्हणजे अगदी पुढच्या वर्षी पर्यंत या मध्ये २६ अब्ज वस्तूंचा समावेश असेल. इंटरनेट ऑफ थिंग्ज विविध गोष्टींचा बोध घेवून त्यांना उपलब्ध नेटवर्क पायाभूत सुविधांचा वापर करून, दूरस्थपणे (remotely) नियंत्रित करू शकेल. यामुळे वास्तविक जग आणि संगणकीय प्रणाली यांचा मेळ घालणे शक्य होणार आहे. अर्थातच याचा फायदा कार्यक्षमता वाढण्यात, अचूकपणा व आर्थिक बचत या सर्वामध्ये होणार आहे. आज मी तुम्हाला काही आय. ओ. टी. संबंधित वस्तूंची माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुमचं जग अगदी बदलून जाईल. १.     हावभाव नियंत्रण करणारे यंत्र ( Gesture Control Armband ): कोणतीही गोष्ट करायची असल्यास आपले हावभाव बदलतात, हात वारे करताना हे टिपता येवू शकतात मग तुमच्या याच हावभावा वर हे यंत्र काम करणार आहे. यात काही इलेक्ट्रोडस् (विद्युत घटाचा ध्रुव) लाव...

तंत्रज्ञानाची कमाल – टेक २

इमेज
तंत्रज्ञान जसं विकसित होतं आहे त्याप्रमाणे मानवजातीस याचा फायदाच होईल, अर्थात त्यासाठीच ते वापरलं गेलं पाहिजे. याच दरम्यान विविध संज्ञा पुढे येताना आपण पाहतो आहोत, जसं कि क्लाऊड कॉम्प्युटिंग, आय.ओ.टी.(इंटरनेट ऑफ थिंग्ज), आय.आय.ओ.टी. (इंडस्ट्रीयल इंटरनेट ऑफ थिंग्ज), ए.आय. (आर्टीफीशिएल इंटेलीजंस), या सर्व विषयांवर मी यापूर्वी लिहिलेलं आहे आणि ते ब्लॉग व माझ्या फेसबुक वॉल वर प्रकाशित देखील केलं आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा कोणतेही क्षेत्र ! विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा मुळी हा डेटाच असणार आहे असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही. हा डेटा युजर विविध कारणांनी शेयर करतो, आणि याचा वापर सॉफ्टवेअर विकासक विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी करतात.         ...

इन्कलाब झिंदाबाद

इमेज
“इन्कलाब झिंदाबाद” हा नारा शहीद भगतसिंग यांनी ८ एप्रिल १९२९ मध्ये दिल्ली विधानसभेत ब्रिटीशांचे लक्ष वेधण्यासाठी जेंव्हा बॉम्बस्फोट (रिकाम्या बाकावर) केला तेंव्हा दिला , हे आपण सगळेच जाणतो. स्वतंत्रता मिळविणे , नव चेतना जागविणे हेतूने, एक संघता राखण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी हा नारा दिला. अनेकांनी प्राणाची आहुती दिली मग या देशास स्वातंत्र्य मिळाले. “इन्कलाब झिंदाबाद” याचा इंग्रजी मध्ये अर्थ होतो, “Long Live Revolution” ज्यास हिंदीत “क्रांती अमर रहे” असे म्हंटले जाते. प्रत्यक्षात “इन्कलाब झिंदाबाद” हा नारा उर्दू कवी व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहनी यांनी १९२१ मध्ये सर्व प्रथम लिहिला. याचा वापर भगतसिंग यांनी १९२९ मध्ये केला. १९१७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर भारतात क्रांतीचे वारे वाहू लागले होते,आर्यलंडच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांनी त्यांना स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले होते, आता हाच धागा भारतातील तरुणांनी पकडला आणि बदलाचे वारे वाहू लागले. १९१८ साली प्रथम जागतिक युद्धाच्या समाप्ती नंतर भारतात असंतोष पसरू लागला होता, लोग रस्त्यावर उतरू लागले होते. या जागतिक युद्धात भारतीय...

गीग इकॉनॉमी म्हणजे काय ?

इमेज
भारतात हि एक नवी अर्थव्यवस्था म्हणून वाढत आहे. विविध सेवा मागणारा एक वर्ग आणि त्या सेवा पुरविणारा दुसरा वर्ग असे या गीग इकॉनॉमी मध्ये म्हंटले जाते. ज्यास आपण टास्क बेस्ड इकॉनॉमी अस संबोधू. पण गीग म्हणजे काय तर एखादी सेवा पूर्ण करणारा एक व्यक्ती अथवा त्याच्या सारखे अनेक व्यक्ती जे एखाद्या सेवेसाठी पुढाकार घेतात आणि ती सेवा पूर्ण करतात. एखादं उदाहरण घेऊया, सुरेशला त्याच्या कंपनीच्या प्रमोशन साठी मार्केटिंग करणे हेतू सेवा घ्यायच्या आहेत, तर त्यास यामध्ये मदत करणारा एक वर्ग जो त्याचा कर्मचारी नाही पण तो /ती सेवा देण्यास समर्थ आहे असे त्यास सेवा देतील (सेवेची किमत हि बोली लावून अथवा जाहीर करून करता येते.) आणि त्या सेवेच्या मोबदल्यात आर्थिक उलाढाल होईल. ज्यास फ्री लान्सिंग असं म्हणतात, म्हणजे सेवा पुरविणारा / देणारा  होण्याकडे भारतात कल वाढतो आहे, कारण हा नऊ ते पाच असा जॉब नाही ठरू शकतं, सेवा देणारा त्याच्या सोईने सेवा पूर्ण करू शकतो फक्त ठरलेल्या वेळेत ती पूर्ण करणे यास महत्व देण्यात येते, आणि मला वाटतं ते आवश्यक आहे.           संपूर्ण जग...

आ री आ जा - बाबांच अंगाई गीत

इमेज
मराठी चित्रपट असो कि हिंदी चित्रपट दोन्ही चित्रपटात अंगाई गीतांना आगळेच महत्व आहे. कधी लिंबोणीच्या झाडा मागे झोपणारा चंद्र, तरी कधी डोळ्यात झोपेस येण्याचे आवतण देणारी आई, एक हवाहवासा वाटणारा फील देण्याचे काम या गीतांनी केले आहे. अंगाई गीतांचे वैशिष्ट्य असे कि याचे बोल जितके भावनिक, संगीत तितकच हृदय स्पर्शी, या अंगाई गीतांमध्ये आईची माया, प्रेम ओतप्रोत अनुभवण्यास मिळतं, काही गीतं ऐकताना डोळ्याच्या कडा कधी ओलावतात कळतच नाही, असचं एक गीत आहे, “कुंवारा बाप” या चित्रपटात, निर्माता अमरलाल छाबरिया आणि निर्देशक महमूद !! १९७४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात “आ री आ जा, निंदिया तू ले चल कही”, हे गीत आहे. हे देखील अंगाई गीतच आहे पण या वेळी स्क्रीनवर आई नाही, तर बाबा, दाखवला आहे. महमूद यांनी चित्रपटात रिक्षाचालकाच्या भूमिकेस पुरेपूर न्याय दिला आहे. किंबहुना ती भूमिका महमूद जगले आहेत असे म्हणाले तरी योग्य होईल. एका रिक्षाचालकास सोडून दिलेलं बाळ सापडतं, तो त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण त्यात अयशस्वी होतो, त्याला जेंव्हा कळतं मुलास पोलिओ झालेला आहे तेंव्हा त्याचं मनपरि...

कुछ तो लोग कहेंगे – उस्ताद आनंद बक्षी

इमेज
गीतकार आनंद बक्षी यांना उस्ताद म्हणणं अगदी योग्य वाटतं मला, कारण जीवनाशी संबंधित अनेक मूल्यं, वास्तव त्यांनी शब्दांच्या जादूने पडद्यावर मांडली. समकालीन गीतकार ज्यामध्ये कवी असणारे मजरूह, कैफी आझमी यांच्या विषयी त्यांनी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते ते त्यांच्या कामावरील निष्ठा दाखवते, ते म्हणाले होते, “कवी हा स्वत:च्या कल्पनेतून लिहितो, मी कथा, पात्र आणि परिस्थितीतून प्रेरित होऊन लिहितो.” कामाप्रती असणारं समर्पणच दिसतं यातून, म्हणूनच चार दशकं रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, ५५० चित्रपट आणि ४००० गीतांद्वारे चित्रपट सृष्टीत योगदान देणारे आनंद बक्षी हे विरळच !! २१ जुलै १९३० रोजी अखंड हिंदुस्थानच्या रावलपिंडी (आता पाकिस्तान मध्ये) येथे त्यांचा जन्म झाला, परंतु फाळणी नंतर हिंदू शरणार्थी म्हणून हिंदुस्थानात आले. आनंदजी यांचे वडील रावलपिंडी येथे एका बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते, घरात सर्वजण त्यांना नंदू म्हणून हाक मारत असतं, त्यांना आनंद प्रकाश म्हणून ओळखलं जात असे पण त्यांचे मित्र-परिवार त्यांना आनंद बक्षी म्हणून संबोधत असत. फाळणी नंतर बक्षी कुटुंब दिल्ली येथे आले आणि...

कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन

इमेज
“ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी ले लो”, या सुदर्शन फाकीर लिखित हे गीत आपण अनेक वेळा ऐकतो आणि आपल्याला वाटतं कि खरच असं घडावं, इच्छा तर खूप होते पण तस काही घडत नाही. बाल्यावस्था, किशोर, तारुण्य, जरावस्था या जीवनातील मनुष्याच्या अवस्था, या प्रत्येक अवस्थेतून मनुष्यास जावे लागते . विविध अवस्थांमध्ये विविध कामना मनुष्य बाळगून असतो, त्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी कार्यरत देखील असतो किंबहुना जीवाचं रान करत असतो. महाविद्यालयीन जीवन , टीन एज आयुष्यातील भन्नाट दिवस, जी काय मजा करायची ती याच दिवसात अस म्हणालो तरी अतिशयोक्ती होणार नाही, पॉकेट मनी हि महाविद्यालयीन जीवनात चालू व्हायची, साधारण ९० च्या दशकात तरी याच वेळी चालू व्हायची पण अलिकडे शाळेतच सुरु होते, असो, पण या पॉकेट मनी मध्ये जी काय धमाल असायची ती आज कमवत असलेल्या पैशात नाही. तसं पाहिलं तर लहानपणी खाऊ साठी पैसे मिळायचे, घरी आलेल्या नातेवाईकां कडून, मग ते पिगी बँकेत साठवायचे आणि खर्च करायचे असल्यास त्यातून खर्च करायचा असा रिवाज होता. या खाऊ साठी मिळणाऱ्या पैशास पॉकेटमनीच म्हणावी, नाही का? हि पॉकेट मनी त्या आयुष्यात मनमुराद आनंद द्यायची,...